Pune crime | फ्रेंडशिप क्लबच्या नावाने अनेकांना चुना लावणारा आरोपी निघाला ‘स्क्रिप्ट रायटर’ ; किती जणांना घातला गंडा , वाचा सविस्तर

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसारअनुज हा 2010 पासून अश्या प्रकारची लोकांची फसवणूक करत आहे. या प्रकारे सेक्ससाठी महिला पुरविण्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या नागरिकांनी स्वतः होऊन पुढे यावे.  सायबर पोलिसांसोबत संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी केले आहे.

Pune crime | फ्रेंडशिप क्लबच्या नावाने अनेकांना चुना लावणारा आरोपी निघाला 'स्क्रिप्ट रायटर' ; किती जणांना घातला गंडा , वाचा सविस्तर
anup manore
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 1:24 PM

पुणे – शहरात ‘फ्रेण्डशीप क्लब’ च्या (Friendship Club) नावाखाली हाय प्रोफाईल महिलांशी शरीर संबंध जुळवून देतो, अशा बाता मारुन अनेकांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघड झाला आहे. आला आहे. या घटनेतील मुख्य आरोपी अनुप सुकलाल मनोरे (वय 35, रा. मोहम्मदवाडी) (Anup Suklal Manore)असल्याचे समोर आले आहे. आरोपी अनुप गेल्या 10  वर्षांपासून हाय प्रोफाईल महिलांशी सेक्स करण्यासाठी ओळख करून देतो असे सांगत महिलांची फसवणूक करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्याने गणेश शेलार या बनावट नावे तो वावरत होता. मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब या नावाने तो क्लब चालवत होता. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी अनुज हा मराठी चित्रपट सृष्टीतील  (Marathi film industry) कलाकारांच्या  सोबत ओळखी असून आरोपी क्रिप्टराईटरचे कामही करत असल्याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. अधिक तपासासाठी न्यायालयाने त्याला उद्यापर्यंतची पोलीस कोठडी दिली आहे.

अशी करायचं फसवणूक

आरोपी अनुज ‘एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा’ मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब या नावाने तो जाहिरात करीत असत. या जाहिरातींच्यादवारे तो अनेक बड्या व्यवसायिकांना आपल्या जाळ्यात अडकवत असत. यासाठी त्याने अनेक गरजू महिलांना नोकरीचे अमिश दाखवत त्यांची फसवणूक त्यांच्याकडून कागदपत्र घेतली आहेत. या कागदपत्रांच्या आधारे नवनवीन सीमकार्ड त्यांने घेतली होती. बड्या लोकांना लालच दाखवत त्यांना गळाला लावल्यानंतर त्यांना याच कागदपत्रांच्या आधारे बँकेत खाते उघडला लावत होता.

पोलिसांनी डायरी  केली हस्तगत

पुणे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपी अनुपला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून डायरी हस्तगत केली आहे. यामध्ये अनुप पैसे दिलेल्या 250 लोकांची नावे समोर आली आहे. तसेच यामध्ये कोणत्या लोकांकडून किती पैसे घेतले आहेत याची नोंद ठेवण्यात आली आहे. डायरीमध्ये पुण्यासह राज्यभरातील अनेक मोठ्या लोकांची नावे असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसारअनुज हा 2010 पासून अश्या प्रकारची लोकांची फसवणूक करत आहे. या प्रकारे सेक्ससाठी महिला पुरविण्याचे आमिष दाखवून फसवणूक झालेल्या नागरिकांनी स्वतः होऊन पुढे यावे.  सायबर पोलिसांसोबत संपर्क साधावा असे आवाहन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी केले आहे. माहिती देण्यासाठी पुढे येणाऱ्या लोकांची नावेही गुप्त ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे.

फसवणुकेच्या पैश्यातून खरेदी केली जमीन

अनुप मनोरे हा स्क्रिप्ट रायटर असून त्याने हिंदी रंगभूमीवरील शेक्यपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित रंग रसिया या नाटकात काम केले होते. त्याच्या मराठी सिनेसृष्टीला अनेक कलाकारांच्या सोबत ओळखी आहेत. आरोपी अनुप हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावातील राहणारा आहे. या प्रकारे फसवणूक करुन लोकांकडून मिळलेले पैसे काढण्यासाठी तो नोकरीचे आमिष दाखवलेल्या महिलांचा वापर करत. त्यांच्याकडून हे पैसे काढून घेत असत.हे पैसे काढण्यासाठी तदरवेळेला संबंधित महिलेला 5 हजार रुपये देत होता. फसवणूक करून मिळालेली पैश्यातून त्यानं रायगड जिल्ह्यात जमीन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातही अनेक लोकांना पैश्याचे वाटप केल्याचे समोर आले आहे.

‘माजी ED अधिकाऱ्याला भाजपचं UPमध्ये तिकीट’ रोहित पवारांच्या वक्तव्यामागचा ‘तो’ BJP उमेदवार हाच!

बिल्डरकडून घराचा ताबा मिळत नाही? तुमच्या मदतीला थेट सुप्रीम कोर्ट, हा महत्वपूर्ण निर्णय….

बिल्डरकडून घराचा ताबा मिळत नाही? तुमच्या मदतीला थेट सुप्रीम कोर्ट, हा महत्वपूर्ण निर्णय….

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.