आमचं सरकार आलं की बघा, बरेच लोक एकामागून एक कसे जेलमध्ये जातात, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ खडसेंचं वक्तव्य

प्रसिद्ध कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे अपशब्द वापरले आहेत.

आमचं सरकार आलं की बघा, बरेच लोक एकामागून एक कसे जेलमध्ये जातात, अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात एकनाथ खडसेंचं वक्तव्य
कार्यक्रमात बोलताना एकनाथ खडसे
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 7:04 AM

पुणे – प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचं आपण पाहिलं आहे, त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रात या वाक्याची राजकीय चर्चा रंगली होती. तसेच अनेक राजकीय नेत्यांनी हे वक्तव्य अत्यंत चुकीचं असल्याचं म्हणटलं होतं. बंडा तात्या कराडकर यांना प्रत्युत्तर देताना एकनाथ खडसें असे म्हणाले की, “वारकरी संप्रदायाचे बंडा तात्या कराडकर यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे अपशब्द वापरले. महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत जे मद्याला हात लावत नाहीत. काही घटक असू शकतात पण सर्वांना एकाच माळेत बंडा तात्यांनी गुंतवू नये.” विशेष म्हणजे पिपंरी चिंचवड महानगरपालिकेत आमची सत्ता आल्यास अनेकांना जेलची हवा खावी लागेल असंही वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.

वरिष्ठांच्या मर्जीशिवाय भ्रष्टाचाराची प्रकरण होऊ शकत नाही 

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील सत्ताधारी भाजपवरती टीका करताना एकनाथ खडसे असे म्हणाले की, स्थायी समिती सभापती लाच प्रकरणी तर माजी उपमहापौर यांना खंडणी प्रकरणी अखेरीस अटक झाली. वरिष्ठांच्या मर्जीशिवाय भ्रष्टाचाराची प्रकरण होऊ शकत नाही. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही सत्तेत आल्यास अनेकांना तुरूंगाची हवा खावी लागणार असल्याचं मोठं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलंय. पिंपरी चिंचवड मधील एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कार्यालय उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेले होते. तिथं त्यांनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं नाही, वरीष्ठाच्या मर्जीशिवाय म्हणजे देवेंद्र फडणवीसांना टोला लगावल्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती.

वाइन दुकानांना महाराष्ट्रात विरोध का ? 

दुकानात वाइनच्या परवानगीबाबत भाजप विरोध महाराष्ट्रात विरोध करताना दिसत आहे, पण मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आणि गोव्यात भाजपने परवानगी दिली असून महाराष्ट्रात आरडाओरडा का करता असा सवाल देखील खडसेंनी भाजपच्या नेत्यांना केला आहे. तसेच कोणताही आमदार किंवा मंत्री कोणत्याही मद्याला स्पर्श करणार त्यासाठी त्यांना शपथ द्या असेही ते म्हणाले आहेत. भाजपाचे वापरा आणि सोडून द्या असं धोरण असल्यामुळे भाजपाला रामराम करावा लागला अशी त्यांनी मनातली खदखद बोलून दाखवली.

बंडा तात्या कराडकरांना अपुरी माहिती

“प्रसिद्ध कीर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे अपशब्द वापरले आहेत. महाराष्ट्रात असे अनेक नेते आहेत जे मद्याला हात लावत नाहीत. काही घटक असू शकतात, पण सर्वांना एकाच माळेत बंडा तात्यांनी गुंतवू नये असे आवाहन एकनाथ खडसेंनी केले.

बंडातात्या कराडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याची महिला आयोगाकडून गंभीर दखल; कारवाईची शक्यता, नेमकं वक्तव्य काय?

Pune Building Collapse : पुण्यात निर्माणाधीन इमारत कोसळली, तिघांचा मृत्यू

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडीसेविकेच्या वारसांना महिला व बालविकास विभागाची 50 लाखाची मदत

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.