Satara Gram Panchayat Election Results 2021: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शंभूराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी पाटणमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. (shambhuraj desai reaction on Gram Panchayat Election Results)

Satara Gram Panchayat Election Results 2021: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शंभूराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया
shambhuraj desai
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 7:06 PM

सातारा: राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत पाटणमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवलं आहे. पाटण तालुक्यात 13 ग्रामपंचायती शिवसेनेला मिळाल्या आहेत. त्यावर शंभूराज देसाई यांनी समाधान व्यक्त केलं आहे. राज्यभरात शिवसेनेला घवघवीत यश मिळत आहे. खेड्यापाड्यातील जनतेने मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व स्वीकारल्याचं त्यातून स्पष्ट होत आहे, असं देसाई यांनी सांगितलं. (shambhuraj desai reaction on Gram Panchayat Election Results)

शंभूराज देसाई यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जनतेची सेवा करण्याचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दिले होते. त्यानुसार आम्ही काम करत होतो. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि जनतेच्या इतर समस्या आम्ही सोडवत होतो. त्याचचं प्रतिबिंब आजच्या निकालात दिसून आलं. लोकांनी शिवसेनेचं नेतृत्व स्वीकारलं आहे. कोविड, वादळ, अतिवृष्टीच्या काळात शिवसेनेने केलेल्या कामाची ही पावतीच आहे. आम्ही तळागाळापर्यंत जाऊन काम केलं. त्याचा हा परिणाम आहे. खेड्यापाड्यातील लोकांनी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर केलेलं हे शिक्कामोर्तब आहे, असं देसाई यांनी सांगितलं.

सत्तेचा उपयोग लोकांसाठी केला पाहिजे. सत्ता ही आमदार, मंत्र्यांना फिरण्यासाठी नसते. ज्या लोकांनी तुम्हाला सत्तेत बसवलं त्या लोकांसाठी सत्ता वापरली पाहिजे. त्यांची कामं केली पाहिजे, ही आमच्या पक्षाची शिकवण आहे. तेच काम आम्ही करत असतो, असं त्यांनी सांगितलं. यापूर्वीही स्थानिक निवडणुकांमध्ये शिवसेना ताकदीने लढत होती. काही ठिकाणी आम्ही सत्तेत होतो. पण स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून जनतेची प्रश्न मोठ्या प्रमाणवर सोडण्याच्या विचार करूनच गेल्या वर्षभरापासून आण्ही लोकांच्या संपर्कात गेलो. पक्षबांधणी केली. त्यामुळेच आज यश मिळत आहे, असंही ते म्हणाले. (shambhuraj desai reaction on Gram Panchayat Election Results)

संबंधित बातम्या:

kolhapur Gram Panchayat Election Results 2021: कोल्हापूरमध्ये भाजपला यश; 13 पैकी 11 जागांवर कमळ

Nagpur Gram Panchayat Election Results 2021: फडणवीसांच्या जिल्ह्यातील गावांचा कारभारी कोण होणार?, निकालाकडे सर्वांचं लक्ष

Nanded Gram Panchayat Election Results 2021: … म्हणून ‘या’ गावात निकाल पाहायला गावकरीच उरले नाहीत

(shambhuraj desai reaction on Gram Panchayat Election Results)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.