Sharad Mohol Murder | शरद मोहोळ याचा खून हा मामाचा वाद नाही, दुसरेच कारण येणार समोर

Sharad mohol murder case | पुणे गँगवारमधून शरद मोहोळ याची शुक्रवारी पाच जानेवारी रोजी दुपारी हत्या झाली. या प्रकरणात आठ आरोपींना २४ तासांत पोलिसांनी पकडले. त्यात दोन वकिलांचा सहभाग आहे. या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आहे.

Sharad Mohol Murder | शरद मोहोळ याचा खून हा मामाचा वाद नाही, दुसरेच कारण येणार समोर
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 8:00 AM

पुणे, दि. 8 जानेवारी 2024 | शरद मोहोळ याचा खून मामाशी असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला. वीस वर्ष वय असलेला साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे हे या खुनाचे सूत्रधार आहेत. हा खून नामदेव कानगुडे सोबत असलेल्या जमिनीचा वादातून झाल्याचे आरोपींनी म्हटले आहे. परंतु त्यांचा हा दावा पटणारा नाही. यामुळे पुणे पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधण्यासाठी कसून चौकशी सुरु केली आहे. शरद मोहोळ याचा खुनामागे बडी धेंडे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. एकमेकांसमोर बसवून आरोपींची चौकशी केली जात आहे.

पोलिसांनी सुरु केली इतर गुन्हेगारांची चौकशी

शरद मोहोळ खून प्रकरण साधे अन् सोपे नाही. यामागे नियोजनबद्ध कट आहे. गुन्हेगारी विश्वातील आरोपी किंवा इतर कोणी यामागे आहे का? याचाही तपास केला जात आहे. यामुळे पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलावले होते. पोलिस आयुक्तालयात सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला सोमवारी पुन्हा बोलवले आहे. हा गुन्हेगार सध्या राजकीय पक्षाशी संबंधित आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा आणि शरद मोहोळ यांच्यात वादही झाला होता.

हे सुद्धा वाचा

आरोपींनी दिल्या होत्या घोषणा?

खून केल्यानंतर आरोपींना एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याचे सांगितले जात आहे. आरोपींनी या घोषणा का दिल्या? तपास भरकटवायचा आहे का? किंवा दुसऱ्या एका गुंडांने शरद मोहोळ याला मारण्याची सुपारी दिली, यासंदर्भात तपास केला जात आहे. या प्रकरणात मारणे टोळी आहे का? कारण संदीप मोहोळ याच्या हत्यनंतर शरद मोहळ याने मारणे टोळीशी बदला घेतला होता. यामुळे शरद मोहोळ मारणे टोळीच्या रडारवर होता, असे बोलले जाते. त्यातूनच मोहोळ याचा ‘गेम’ झाला का? ही शक्यता पोलीस तपासात आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.