AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवार-फडणवीस आमनेसामने!, शिवाजी कर्डीले पुन्हा रिंगणात

अहमदनगर जिल्हा बँक निवडणुकीतही भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगताना पाहायला मिळत आहे.

अहमदनगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पवार-फडणवीस आमनेसामने!, शिवाजी कर्डीले पुन्हा रिंगणात
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 2:42 PM

अमहदनगर : जिल्हा सहकारी बँक निवडणुकीला यंदा पहिल्यांदाच राजकीय रंग चढला आहे. राज्याप्रमाणेच या निवडणुकीतही भाजप विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये सामना रंगताना पाहायला मिळत आहे. त्यातच माजी आमदार शिवाजी कर्डीले हे स्वत: या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कर्डीले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी नगर तालुक्यातील 109 पैकी 100 मतदार आपल्यासोबत असल्याचा दावा कर्डीले यांनी केला आहे. दुसरीकडे भाजपच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. तर रविवारी शरद पवार नगरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलं आहे.(Sharad Pawar and Devendra Fadnavis also interfered in Ahmednagar DCC Bank elections)

अहमदनगर जिल्हा बँकेतील संचालक मंडळाच्या 21 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी आहे. तर 20 फेब्रुवारीला मतदान पार पडेल. या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींनी आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान बँकेच्या निवडणुकीत दरवेळी विखे-पाटील विरुद्ध थोरात असं चित्र पाहायला मिळत. पण यावेळी पवार आणि फडणवीसांमधील संघर्षही जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पाहायला मिळू शकते.

शिवाजी कर्डीलेंची विरोधकांवर टीका

साखर कारखानदारांची असलेली जिल्हा बँक आपण शेतकऱ्यांची बनवली. शेतकऱ्यांना 140 कोटी रुपयांचं वाटप केलं. गेल्या 10 वर्षांपासून आपण बिनविरोध निवडून येत आहोत. यंदाही आपल्याविरोधात उमेदवार देण्यासाठी विरोधकांना शोध घ्यावा लागेल, अशी म्हणज माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विरोधकांवर टीका केली.

विखेंच्या नेतृत्वात निवडणूक

यंदा भाजपने पक्षीय पातळीवर ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. भाजपकडून ही निवडणूक विखे-पाटील यांच्या नेतृत्वातच होणार आहे. पण आता भाजपमध्ये असलेल्या अनेकांनी यापूर्वी थोरातांसोबत बँकेची निवडणूक लढवली होती. तसंच विधानसभा निवडणुकीनंतर विखेंविरोधात तक्रार केलेले अनेक नेतेच बँकेशी संबंधित आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर या नेत्यांची मोट बांधणं कठीण असल्यानं फडणवीसांना यात लक्ष घालणं गरजेचं ठरलं आहे. दरम्यान, जिल्हा बँक निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री राम शिंदे आणि माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आली आहे. तर फडणवीस यात स्वत: लक्ष घालणार आहेत.

पवारांचा नगर दौरा

दुसरीकडे राज्याप्रमाणे जिल्हा बँक निवडणुकीतही महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसनं जाहीर केलं आहे. पण शिवसेना आणि काँग्रेसनं अद्याप आपली भुमिका जाहीर केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार हे रविवारी नगरचा दौरा करणार आहेत. एका खासगी रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी पवार नगरला येत आहेत. तेव्हा जिल्हा बँकेच्या निवडणुकीबाबतही व्यूहरतना आखली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित बातम्या : 

भाजपला आणखी एक झटका?, पुण्यातील माजी आमदार राष्ट्रवादीत जाणार; अजितदादांशी खलबतं!

‘शिवसेनेची सत्ता उलथवण्यासाठी शक्य ते सर्व करु’, भाजपचे प्रसाद लाड राज ठाकरेंच्या भेटीला

Sharad Pawar and Devendra Fadnavis also interfered in Ahmednagar DCC Bank elections

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.