मी येणारच काही जमेना म्हणून अस्वस्थ झालेल्यांकडून सरकार अस्थिर करण्याचा डाव; शरद पवारांचा दावा
मी येणारच असं काही लोक सतत सांगत होते. पण ते येणारच हे काही जमेना म्हणून अस्वस्थ झालेल्या लोकांनी सत्तेचा गैरवापर करून राज्याल अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. (sharad pawar attacks devendra fadnavis over various issue)
पुणे: मी येणारच असं काही लोक सतत सांगत होते. पण ते येणारच हे काही जमेना म्हणून अस्वस्थ झालेल्या लोकांनी सत्तेचा गैरवापर करून राज्याल अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं सांगतानाच आमच्या सत्ताधारी नेत्यांवर होत असलेल्या चौकश्या या राजकीय आकसाने सुरू आहेत, असा दावा शरद पवार यांनी केला.
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केला. चौकशीचा अधिकार मला मान्य आहे. पण चौकशी केल्यानंतर काम संपल्यावर तिथे थांबू नये. पण बिचाऱ्या पाहुण्याचा दोष नव्हता. त्यांना वरुन आदेश होते. हे सगळं चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्यासाठी हे पावलं टाकली जात आहेत. यंत्रणेचा गैरवापर स्पष्टपणे दिसतोय, असं पवारांनी सांगितलं.
धाडीतून काही निष्पन्न होईल असं वाटत नाही
अजित पवारांच्या बहिणींच्या घरी जाऊन आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. तिथे जाऊन मी चौकशी केली. कागदपत्र पाहिली. त्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. त्यांच्या घरी 5 दिवस 14 ते 15 लोकं छापेमारीसाठी गेले होते. त्याचं वागणं वाईट होतं असं नाही. त्याबद्दल तक्रार नाही. त्यांना हाती काही लागलं नाही तरी त्यांना तिथे थांबवण्यात आलं. ते बिचारे शांतपणे पुढील आदेश येईपर्यंत बसून राहिले. मध्यमवर्गीय माणसाच्या घरी असं पाच -पाच दिवस येऊन राहणं किती योग्य आहे? असा सवाल पवारांनी केला.
भाजपचे नेते प्रतिक्रिया का देतात?
काही लोक समर्थन करण्यासाठी पुढे आले. खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येतात. कधी माजी मुख्यमंत्री, कधी मुंबईचे त्यांचे माजी अध्यक्ष पुढे येतात. अशा प्रकरणात त्या यंत्रणा, त्यांच्या प्रवक्त्यांनी भाष्य केलं तर मी समजू शकतो. पण भाजपचे नेते पुढे येतात. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर करण्यासाठी सर्व सुरु आहे. हे दिसून येतं असंही त्यांनी सांगितलं.
फडणवीस बोलल्यावर तपास यंत्रणा कामाला का लागतात?
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर नेत्यांनी काही प्रतिक्रिया दिली किंवा आरोप केल्यानंतर लगेच तपास यंत्रणांकडून कारवाया केल्या जात आहेत. हा काय प्रकार आहे? राज्यात हे पहिल्यांदाच घडत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 October 2021 https://t.co/USApX9K4fX #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 16, 2021
संबंधित बातम्या:
Mumbai Drugs Case : ‘पुरावे द्या, मग बोला’, यास्मिन वानखेडे यांचं नवाब मलिकांना आव्हान
‘आंतरराष्ट्रीय दर कमी झाले तरी पेट्रोल डिझेल महागच,’ मोदी सरकार शरद पवारांच्या निशाण्यावर
(sharad pawar attacks devendra fadnavis over various issue)