पवार कुटुंबिय दुसऱ्यांदा एकत्र, श्रीनिवास पवारांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असली तरी पवार कुटुंबात फूट पडलेली नाही. पवार कुटुंबिय दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येताना दिसलं आहे. गेल्या आठवड्यात प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तर आज अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

पवार कुटुंबिय दुसऱ्यांदा एकत्र, श्रीनिवास पवारांच्या घरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 10:43 PM

प्रदीप कापसे, Tv9 मराठी, पुणे | 13 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेल्या आठवड्यात भेट झाल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या निवासस्थानी ही भेट घडून आलेली. त्यानंतर आता आणखी तशाच घडामोडी घडून आल्या आहेत. दिवाळीच्या निमित्ताने पवार कुटुंबिय पुन्हा एकत्र आले आहेत. त्यामुळे आज पुन्हा शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घडून येणार असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरी दिवाळीच्या निमित्ताने स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाला पवार कुटुंब दुसऱ्यांदा एकत्र आल्याची माहिती समोर आली आहे.

दिवळीच्या निमित्ताने पवार कुटुंबियांची अशी एकत्र भेट घडून येते. दरवर्षी दिवाळीला सर्व पवार कुटुंबिय एकत्र येतात. त्यातूनच आजचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. श्रीनिवास पवार यांच्या घरी देखील आयोजित कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवार हे जेवणासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. याआधी प्रतापराव पवार यांच्या निवास्थानी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट घडून आली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती.

सुप्रिया सुळेंकडून फोटो ट्विट

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी आजच्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या फोटोत सर्व पवार कुटुंबिय शरद पवार यांच्यासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. या फोटोत अजित पवार दिसत नाहीयत. पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार दिसत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार कुटुंबिय पुन्हा एकदा एकत्र आल्याची चर्चा आहे.

अजित पवार उद्या गोविंद बागेत जाणार?

गोविंद बागेत पवार कुटुंबियांचा दिवाळी पाडव्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. या दिवशी शरद पवार सर्व कुटुंबियांसह अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतात. अनेक नेते शरद पवारांच्या भेटीसाठी येतात. त्यामुळे अजित पवार उद्या गोविंद बागेत कार्यक्रमासाठी जाणार का? अशी चर्चा सुरु असताच आज पुन्हा पवार कुटुंबिय एकत्र आले आहेत.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.