अजित पवार बारामतीत नाही, शरद पवार यांनी अजितदादा यांचा उल्लेख टाळला; म्हणाले…

दुष्काळ परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं. राज्यात पुरेसा पाऊस झाला नाही, पाणी नाही, जनतेचे हाल आहेत. जनावरांचेही हाल आहेत. राज्याने याबाबत केंद्र सरकारला योग्य माहिती दिली नाही. त्यात सरकार कमी पडलं. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या कानावर प्रश्न मांडला. त्यावर निर्णय घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. दोन चार दिवसात काही तरी होईल असं दिसतं, असं शरद पवार म्हणाले.

अजित पवार बारामतीत नाही, शरद पवार यांनी अजितदादा यांचा उल्लेख टाळला; म्हणाले...
sharad pawar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2023 | 1:34 PM

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती | 14 नोव्हेंबर 2023 | राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे दिवाळी पाडव्यानिमित्ताने त्यांच्या समर्थकांना सकाळपासूनच भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधत आहेत. पाडव्या निमित्ताने पवार कुटुंबातील लोक एकत्र आले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार पहिल्यांदाच गोविंदबागेत आले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रोहित पवार दौऱ्यावर असल्याने आले नाहीत. तर अजित पवार हे आजारी असल्याने आले नसल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार यांनीही त्याबाबत भाष्य केलं. यावेळी पवारांनी रोहित पवार यांच्या नावाचा उल्लेख केला. पण अजित पवार यांचं नाव घेणं टाळलं. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दिवाळी पाडव्यानिमित्त संपूर्ण पवार कुटुंब आलं. पण अजित पवार आणि रोहित पवार दिसत नाहीये, असा सवाल त्यांना करण्यात आला. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांचा उल्लेख टाळत उत्तर दिलं. काही कामं असतील. रोहित यांचा दौरा सुरू आहे. प्रत्येकाची काही कामं आहेत, कुणाचा आजार असेल. त्यामुळे समज गैरसमज करण्याचं कारण नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच तुम्ही स्थानिक आहात. आज मला लोक भेटायला आलेले पाहिले. त्यात काही कमतरता दिसली का? असा सवालही शरद पवार यांनी केला.

मुख्यमंत्र्यांना सल्ला

मुंब्र्यातील शिवसेनेच्या शाखेच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. अनेक वर्षापासून ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. तिथे त्यांची संघटना मजबूत आहे. त्यांची कार्यालये मजबूत आहेत. अनेक वर्षापासूनचं शिवसेनेचं ऑफिस बुलडोझर लावून तोडलं असेल, अशा गोष्टी टाळल्या पाहिजे. राज्याच्या प्रमुखाकडून अपेक्षा हीच असते की, त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून सर्वांना बरोबर घेतलं पाहिजे, असा सल्ला देतानाच अशा प्रकारे कार्यालये तोडणं उद्ध्वस्त करणं योग्य नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं.

तसा वाद नाही

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू झाला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. तसा वाद लोकांमध्ये नाही. काही लोक तसं वातावरण करत आहेत. पण सामान्य लोकांना त्यात रस नाही. लोकांना त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, यातच रस आहे. ओबीसी असो की मराठा असो त्यांचे न्याय प्रश्न राज्य आणि केंद्राने सोडावावे ही अपेक्षा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर वातावरण सुधारेल

मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीला मला निमंत्रण होतं. त्याला विविध पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना जी अपेक्षा होती. त्याची पूर्तता करण्याची भूमिका मांडली. त्याबाबत पाऊल टाकतो असं मुख्यमंत्री म्हणाले. तो निर्णय त्यांनी लवकर घेतला तर वातावरण सुधारेल, असंही ते म्हणाले.

हा तर संकुचितपणा

मत दिल्यास अयोध्येची वारी मोफत करून देऊ असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं होतं. त्यावर पवारांनी टीका केली. मतदारांना काही तरी गोष्टी कबूल करायची आणि मतं घ्यायची, त्याचं हे उदाहरण आहे. उद्या राम मंदिर झालं तर ज्याला रामाबद्दल अस्था आहे, तो दर्शन घेऊ शकतो. रामाचं दर्शन घेण्याचा त्यांचा अधिकार आहे. त्याबाबत सरकारने धोरण आखण्याची गरज नाही. पण निवडणुकीसाठी राम मंदिराचा लाभ घेण्याचा प्रयत्न करणं हे संकुचित आहे, अशी टीका त्यांनी केली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.