शरद पवार यांची काँग्रेस, ठाकरे गटापासून वेगळी वाट, अदानी यांचे कौतूक करत…

ncp chief sharad pawar gautam adani | शिवसेना आणि काँग्रेसकडून प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सातत्याने टीका केली जाते. मात्र शरद पवार यांनी पुन्हा एकदा गौतम अदानी यांचे कौतूक केले आहे. त्यांनी गौतम अदानी यांना धन्यवादही दिले आहेत.

शरद पवार यांची काँग्रेस, ठाकरे गटापासून वेगळी वाट, अदानी यांचे कौतूक करत...
sharad pawar gautam adani
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 8:32 AM

पुणे, दि.24 डिसेंबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे प्रणते म्हटले जातात. परंतु अनेक मुद्यांवर महाविकास आघाडीत बिघाडी आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सातत्याने कठोर टीका करत असतात. शिवसेना उबाठा पक्षाकडून गौतम अदानी यांना लक्ष केले जाते. नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारवीकरांसाठी अदानी यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. महाविकास आघाडीचे दोन पक्ष गौतम अदानी यांच्याविरोधात सातत्याने भूमिका घेत आहे. मात्र शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस गौतम अदानी यांच्यासोबत आहे. यापूर्वी अनेक वेळा हे दिसून आले आहे. आता शनिवारी बारामतीत शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतूक केले. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात गौतम अदानी आणि शरद पवार यांची बैठक झाली होती. अहमदाबादमधील अदानी यांच्या घरी ही बैठक झाली होती. त्यापूर्वी एप्रिल महिन्यात अदानी यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओकवर भेट घेतली होती.

काय म्हणाले शरद पवार

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिनिअरींग कॉलेजच्या रोबोटीक लॅबचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतूक केले. त्यांनी गौतम अदानी यांना धन्यवाद दिले. या कार्यक्रमात फिनोलेक्स पॉवर सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन दीपक छाबरिया उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे इंजिनिअरींग क्षेत्र वेगाने बदलत आहे. यामुळे युवकांनी हा बदल स्वीकारला पाहिजे. देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटर आम्ही बारामतीत बनवत आहोत. या योजनेसाठी २५ कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी निधीची व्यवस्था झाली आहे. यावेळी गौतम अदानी यांचे नाव घ्यावे लागणार आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी २५ कोटींचा धनादेश पाठवला आहे. फर्स्ट सिफोटेकने दहा कोटी रुपये दिले आहे. या दोघांच्या मदतीमुळे आम्ही हा प्रकल्प साकारु शकत आहोत.

हे सुद्धा वाचा

बारामतीत पहिल्या स्मार्ट कारखान्याचा निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, बाजारपेठेत मशीन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरची माहिती असणाऱ्या मनुष्यबळाची गरज आहे. ही वाढती मागणी पूर्ण कराण्यासाठी देशात नवीन तंत्रज्ञान असलेल्या कुशल अभियंत्यांची गरज आहे. यामुळेच विद्या प्रतिष्ठानने बारामतीसारख्या ग्रामीण भागात सुमारे चार हजार चौरस फुटांमध्ये पहिला स्मार्ट कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.