आधी पुतण्याला आला, आता काका, पवार फॅमिली अभेद्य… शरद पवार थेट अजितदादांच्या घरी

पवार कुटुंबाने यंदाही दरवर्षी प्रमाणे दिवाळी उत्सव अत्यंत दणक्यात साजरा केला आहे. दिवाळी पाडव्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब गोविंद बागेत एकवटलं होतं. यावेळी भोजन आणि फोटोसेशनही पार पडलं. अजित पवारही शरद पवार यांच्या निवासस्थानी आले होते. त्यामुळे पवार कुटुंब अभेद्य असल्याचं अधोरेखित झालं. तसेच पवार कुटुंबाबत मीडियातून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविरामही मिळाला आहे.

आधी पुतण्याला आला, आता काका, पवार फॅमिली अभेद्य... शरद पवार थेट अजितदादांच्या घरी
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 1:48 PM

प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 15 नोव्हेंबर 2023 : देशभरात दिवाळीचा उत्सव सुरू आहे. फटाके फोडून सर्वच जण दिवाळी साजरी करत आहेत. कुटुंब एकत्र येऊन दिवाळीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा करताना दिसत आहेत. भेटीगाठी आणि भेटवस्तू देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहे. मात्र, राज्यात पवार कुटुंबाच्या दिवाळीकडेच संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अजित पवार यांनी वेगळी राजकीय चूल मांडल्याने पवार कुटुंबाच्या दिवाळीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अजित पवार गोविंदबागेत येतील की नाही ही चर्चा सुरू असतानच अजित पवार यांनी गोविंद बागेत जाऊन दिवाळी साजरी केली. त्यानंतर आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.

अजित पवार यांनी काल संध्याकाळी उशिरा गोविंद बागेत जाऊन दिवाळी साजरी केली. त्यापूर्वी त्यांचे चिरंजीव पार्थ पवार हे गोविंद बागेत आले होते. यावेळी त्यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर संध्याकाळी अजित पवार सहकुटुंब गोविंद बागेत आले. सर्वांनी एकत्र जेवण केलं. गप्पा मारल्या. त्यानंतर एकत्रित फोटोही काढले. आज भाऊबीज असल्याने सुप्रिया सुळे या सकाळीच काटेवाडीत अजित पवार यांच्या निवासस्थानी गेल्या.

शरद पवार काठेवाडीत

सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीत जाऊन अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर दोन तासाने शरद पवारही अजितदादा यांच्या निवासस्थानी आले आहेत. अजितदादा यांच्या घरी भाऊबीजेचा कार्यक्रम असतो. त्यानिमित्ताने पवार कुटुंब अजितदादांच्या घरी जमलं आहे. या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन दुपारचं जेवण घेणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

चार फोटो आणि पोस्ट

काल दिवाळी पाडव्यानिमित्ताने संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं. अजित पवारही गोविंदबागेत आले होते. या कुटुंबाने दरवर्षीप्रमाणे यंदाही एकत्र फोटोसेशन केलं. या फोटोत अख्खं पवार कुटुंब दिसत आहेत. शरद पवार यांच्या मागे अजितदादाही दिसत आहेत. सुप्रिया सुळे यांनी कुटुंबातील हे चार फोटो पोस्ट केले आहेत. फेसबुकवर हे फोटो पोस्ट करत त्यावर Blessed! Embracing the beauty of our traditions with pride! असं कॅप्शन दिलं आहे.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

दरम्यान, पवार कुटुंबाच्या एकत्र येण्यावर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कितीही मतभेद असले तरी एकत्र येणं ही पवार कुटुंबायांची खासियत आहे. तेच त्यांचं वैशिष्ट्ये आहे. दर दिवाळीला पवार कुटुंब एकत्र येतं. यावेळीही आले. पवार कुटुंब एकत्र आले असले तरी त्यांच्यातील मतभेद काही कमी झालेले नाहीत. मतभेद कायम आहेत, असं मोठं विधान चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. पाटील यांच्या या विधानामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.