Sharad Pawar : माणूस चंद्रावर गेला तो विज्ञानामुळेच! बारामतीतल्या सायन्स सेंटरच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अधोरेखित केलं विज्ञानाचं महत्त्व

प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायला हवा. विचार करण्याची मानसिकता विज्ञानाच्या आधारेच व्हायला हवी. विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने अनेक गोष्टी केल्या. माणूस चंद्रावरच काय, मंगळावर जात आहे. हे सर्व शक्य होत आहे, ते केवळ विज्ञानामुळे, असे शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar : माणूस चंद्रावर गेला तो विज्ञानामुळेच! बारामतीतल्या सायन्स सेंटरच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अधोरेखित केलं विज्ञानाचं महत्त्व
शरद पवार (संपादित छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 3:30 PM

बारामती, पुणे : जीवनात कोणत्याही क्षेत्रात काम करताना वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. वैज्ञानिक दृष्टी तयार होणे, जीवनात विज्ञानाला बरोबर घेऊन काम करणे गरजेचे असल्याचे मत माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले. ते बारामतीत बोलत होते. सायन्स अॅन्ड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटरचे उद्घाटन आज करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी त्यांनी विज्ञानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना (Students) समजून सांगितले. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani), शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पवारांना या केंद्राचे महत्त्वही सांगितले. ते म्हणाले, की हे केंद्र तुम्हाला उपयोगी पडल्याशिवाय राहणार नाही. हे केंद्र बघितल्यावर तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे.

‘माणूस चंद्रावर गेला, मंगळावर गेला, तो विज्ञानामुळेच’

शरद पवार पुढे म्हणाले, की प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगायला हवा. विचार करण्याची मानसिकता विज्ञानाच्या आधारेच व्हायला हवी. विज्ञानाच्या सहाय्याने मानवाने अनेक गोष्टी केल्या. माणूस चंद्रावरच काय, मंगळावर जात आहे. हे सर्व शक्य होत आहे, ते केवळ विज्ञानामुळे. याच विज्ञानाचा कसा वापर करावा आणि यश कसे मिळवावे, हे समजणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. त्यासाठीच हे केंद्र मदत आणि मार्गदर्शन करेल. त्यामुळे तुमच्यातील आत्मविश्वासदेखील वृद्धींगत होईल, असे पवार यावेळी म्हणाले.

काय म्हणाले अनिल काकोडकर?

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की आपण विद्यार्थी दशेत आहोत आणि विद्यार्थी दशेतच राहावे. एखादा प्रश्न जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत विचारत राहणे, हाच आपला स्वभाव असायला हवा, असे शास्त्रज्ञ अनिल काकोडकर म्हणाले. आजचे जग हे इनोव्हेशनचे आहे. याआधी महाराष्टात पाच ठिकाणी अशी सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असे एक केंद्र उभे राहावे, अशी गरज त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना त्याठिकाणी जाता यावे, वैज्ञानिक कुतूहल निर्माण करण्यासाठी केंद्राचा उपयोग होईल, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

स्नेहभोजन आणि…

उद्योगपती गौतम अदानी स्नेहभोजनासाठी शरद पवारांचे निवासस्थान गोविंदबागेत आले होते. यावेळी शरद पवारांसह सुप्रिया सुळे, अनिल कोकडकर आदी मान्यवरांनी एकत्र येत स्नेहभोजन केले.

प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.