खुद्द शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं

खुद्द शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिभा पवार नात रेवती सुळे यांच्यासोबत खरेदीसाठी टेक्स्टाईल पार्कला गेल्या होत्या. पण त्यांना अर्धा तास गेटवर थांबवून ठेवण्यात आलं.

खुद्द शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास रोखलं
Follow us
| Updated on: Nov 17, 2024 | 4:02 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना बारामती येथील टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास गेटवर थांबवण्यात आलं. प्रतिभा पवार यांच्यासोबत त्यांच्या नात रेवती सुळे या देखील होत्या. दोन्ही जण टेक्स्टाईल पार्क येथे खरेदीसाठी गेले होते. पण टेक्स्टाईल पार्कच्या गेटवरच प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना रोखण्यात आलं. जवळपास अर्धा तास दोघांना गेटवरच थांबवण्यात आलं. प्रतिभा पवार यावेळी आपल्याला प्रवेश का दिला जात नाही? असा प्रश्न तेथील सुरक्षा रक्षकाला विचारतात. त्यावेळी आपल्याला वरिष्ठांकडून कोणतीही गाडी आत सोडण्यास नकार देण्यात आल्याचं गेटवरील सुरक्षा रक्षक म्हणतो. या घटनेचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बारामतीत सध्या विधानसभा निवडणुकीवरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. इथे पवार कुटुंबातीलच दोन उमेदवार आमनेसामने आहेत. विशेष म्हणजे पवार काका-पुतण्यात ही लढाई आहे. शरद पवार यांचे नातू युगेंद्र पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात ही लढाई आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील प्रचारासाठी बाहेर पडल्या आहेत. ते बारामती तालुक्यातील विविध गावांमध्ये जावून मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तर रेवती सुळे या देखील रस्त्यावर उतरुन युगेंद्र पवार यांचा प्रचार करत आहेत. त्यामुळे प्रतिभा पवार आणि रवेती सुळे यांना टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर अर्धा तास थांबवून ठेवण्यामागे निवडणुकीच्या राजकारणाचं किनार आहे का? हे पाहणं आता महत्त्वाचं आहे.

टेक्स्टाईल पार्कचे सीईओ काय स्पष्टीकरण देणार?

बारामती टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल पवार यांनी गेटवरुन एकही गाडी आतमध्ये सोडू नये, असा आदेश दिल्याची चर्चा आहे. पण सुरक्षा रक्षकाला टेक्स्टाईल पार्क सुरु आहे का? असा प्रश्न विचारला असता, सुरक्षा रक्षक सुरु असल्याचं म्हणतो. पण आपल्याला एकही गाडी आत सोडायला सांगितलेली नाही, असंही तो सुरक्षा रक्षक म्हणतो. त्यामुळे प्रतिभा पवार यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास का रोखण्यात आलं? याबाबत टेक्स्टाईल पार्कचे सीईओ अनिल पवार यांच्याकडून काय स्पष्टीकरण येतं? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्रतिभा पवार यांनी स्वत: बनवला व्हिडीओ

दरम्यान, प्रतिभा पवार यांना टेक्स्टाईल पार्कच्या गेटवर रोखण्यात आलं तेव्हा त्यांनी स्वत: सुरक्षा रक्षकासोबत बोलतानाचा व्हिडीओ बनवला. आतमध्ये टेक्स्टाईल पार्क सुरु आहे का? असा प्रश्न प्रतिभा पवार सुरक्षा रक्षकाला विचारतात. यानंतर सुरक्षा रक्षक हो सुरु असल्याचं म्हणतो. मग आपल्याला तिथे खरेदीसाठी जायचं आहे. आपल्याला का जाऊ दिलं जात नाही? असा प्रश्न प्रतिभा पवार विचारतात? त्यावर सुरक्षा रक्षक आपल्याला आतमध्ये एकही गाडी सोडू नये, असा आदेश देण्यात आल्याचं सांगतो. या व्हिडीओवरुन आता बारामतीचं राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे. प्रतिभा पवार यांना टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यास का मज्जाव करण्यात आला? याबाबतचं गूढ आता वाढलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.