पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा, नरेंद्र मोदी-शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर

महाविकास आघाडीनं नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करण्याचं कारण म्हणजे मणिपुरातील परिस्थिती होय. मोदी यांनी पुरस्कार घेण्याऐवजी थेट मणिपुरात जावं, असं मविआचं म्हणणं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा, नरेंद्र मोदी-शरद पवार येणार एकाच व्यासपीठावर
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 4:43 PM

पुणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 तारखेला पुणे दौऱ्यावर येत आहेत. लोकमान्य टिळक पुरस्काराने त्यांना गौरवण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक पुरस्काराने जरी त्यांना गौरविण्यात येणार असलं तरी चर्चा आहे ती म्हणजे शरद पवार यांची. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अध्यक्ष म्हणून व्यासपीठावर उपस्थित असणार आहेत. शरद पवार जरी व्यासपीठावर असले तरी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी ही मोदींना विरोध करणार आहे. मोदींच्या दौऱ्याला काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत. मोदींनी पुण्यात येऊन लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार घेण्याऐवजी मणिपुरात जाऊन मोदींनी चर्चा करावी तिथले प्रश्न समजून घ्यावेत, अशी मागणी महाविकास आघाडीने केली. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटही सहभागी असणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

रोहित टिळक यांच्यावर कारवाई होणार?

महाविकास आघाडीनं नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याला विरोध करण्याचं कारण म्हणजे मणिपुरातील परिस्थिती होय. मोदी यांनी पुरस्कार घेण्याऐवजी थेट मणिपुरात जावं, असं मविआचं म्हणणं आहे. लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार जरी दिला जाणार असला तरी रोहित टिळक हे काँग्रेसचेच नेते आहेत. त्यामुळे स्थानिक पुणे काँग्रेसनंही त्याला विरोध केला आहे. रोहित टिळक यांची तक्रारही काँग्रेसनं वरिष्ठांकडे केली. त्यामुळे रोहित टिळकांवर काय कारवाई होणार हे कळेल. असं सूचक विधान काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केलं.

दोन महिन्यांपूर्वी कार्यक्रमाचे नियोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेचं व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्यानं महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुरस्कार स्वीकारण्यासाठी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना निरोप दिला होता. दोन महिन्यांपूर्वी टिळक कुटुंबानं शरद पवार यांना विनंती केली होती. त्यानुसार, कार्यक्रमाचं अध्यक्षपद शरद पवार यांनी स्वीकारावं, असं टिळक कुटुंबानं सांगितलं होतं. दोन महिन्यांपूर्वी या कार्यक्रमाचं नियोजन ठरलं आहे. त्यामुळे शरद पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. शरद पवार जरी उपस्थित राहिले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून पंतप्रधानांना विरोध करणार आहे. पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरचं बाबा आढावांची संघटनाही यामध्ये सहभागी होणार आहे.

अरविंद केजरीवाल यांचे आवाहन

शरद पवार यांच्याभोवती राज्याबरोबरचं दिल्लीचंही राजकारण फिरतंय. दिल्लीत दिल्लीच्या अध्यादेशाविरोधात विरोधी पक्षांनी एकत्रित यावं, असं आवाहन अरविंद केजरीवालांनी केलं. सोमवारी लोकसभा किंवा राज्यसभेत या अध्यादेशावर मतदान होण्याची शक्यता आहे. जर पवार या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले तर इंडियाच्या बैठकीवर याचा काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.