पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर शरद पवार काय करणार ? दिल्लीवरुन परताच…

NCP Sharad Pawar | शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर अजित पवार यांच्यासाठी दिलासा देणारा निर्णय आहे. निवडणूक आयोगानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच शरद पवार यांनी आपली तयारी सुरु केली आहे.

पक्ष अन् चिन्ह गेल्यानंतर शरद पवार काय करणार ? दिल्लीवरुन परताच...
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 2:16 PM

योगेश बोरसे, पुणे, दि. 8 फेब्रुवारी 2024 | शिवसेना कोणाची ? या प्रश्नानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्या पवारांचा? या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी मिळाले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर अजित पवार यांच्यासाठी दिलासा देणारा निर्णय आहे. निवडणूक आयोगानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णय येण्यापूर्वी शरद पवार पुन्हा नव्याने उभारणीसाठी तयार झाले आहेत. सध्या शरद पवार दिल्लीत आहेत. दिल्लीवरुन परतल्यानंतर पुढच्या आठवड्यात ते कामाला लागणार आहे.

शरद पवार करणार राज्यव्यापी दौरा

शरद पवार राज्यव्यापी दौरा करण्याची शक्यता आहे. १५ ,१६ आणि १७ तारखेला शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात करणार दौरा आहे. त्यानंतर १८ तारखेला शरद पवार यांचा पुरंदर दौरा असणार आहे. २१ तारखेला आंबेगाव दौरा करणार आहे. आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघात आहे. कधीकाळी दिलीप वळसे पाटील शरद पवार यांचे विश्वासू समजले जात होते.

लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याला आतापासून सुरुवात होणार आहे. शरद पवार राज्य पिंजून काढणार आहे. पुन्हा नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यव्यापी या दौऱ्यात भाजपसोबत अजित पवार यांनाही ते लक्ष्य करणार आहेत.

हे सुद्धा वाचा

पवार यांना नवीन पक्ष मिळाल्यानंतर पहिला मेळावा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला सध्या तात्पुरते नवीन नाव मिळाले आहे. आज पुण्यातील हडपसरमध्ये या पक्षाचा पहिला मेळावा होत आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहे. पक्षाला नवे नाव मिळाल्यानंतर पहिला जाहीर मेळावा होणार आहे. पुण्यातील सर्व विधानसभा मतदार संघातील अध्यक्ष, सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

हे ही वाचा

आता निवडणुका झाल्यास NDA ला किती जागा, महाराष्ट्रात महायुतीला फायदा की तोटा

मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.