पुणे: ईडीने सुरू केलेल्या कारवायांवर शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी टीका केली आहे. ठरावीक लोकांवर आणि वेळ साधूनच ईडीच्या कारवाया होत आहेत, अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी केली आहे. (shiv sena leader urmila matondkar slams bjp over ED action)
उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते आज शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी टीव्ही9 मराठीशी खास बातचीत करताना त्यांनी ही टीका केली आहे. ईडीच्या कारवाया वेळा साधून होत आहेत. त्यावर प्रश्न निर्माण होत आहे. ठरावीक पक्ष आणि लोकांवरच कारवाया होत आहेत. हे जास्तच साधून आलंय, अशी टीका उर्मिला यांनी केली आहे.
शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राठोड मंत्रिमंडळात येणार का? या चर्चा केवळ प्रसारमाध्यमात आहेत. तुम्ही लोकं यावर चर्चा करत आहात, अशी प्रतिक्रिया त्यांनी केली. यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीवर बोलण्यास नकार दिला. मला यावर बोलायचं नाही, असं त्या म्हणाल्या.
‘सामना’बाबत शिवसेना नेते संजय राऊतच अधिक माहिती देतील. तो त्यांना अधिकार आहे. दुसऱ्या कुणाला अधिकार नाही. शिवसेनेत नसलेल्या लोकांनी तर त्यावर बोलूच नये, अशा शब्दात त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समाचार घेतला.
यावेळी त्यांना स्वबळावर निवडणुका घेण्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा, निवडणुका स्वबळावर लढवाव्यात की एकत्रितपणे याचा निर्णय आमचं नेतृत्व घेईल, असं सांगतानाच शिवसंपर्क मोहिमेद्वारे शिवसेना घराघरात पोहोचणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
शिवसेना नेहमीच मदतीसाठी पुढे आली आहे. कोरोना काळात तर शिवसेनेने लोकांना मदत केली आहे. सेना सत्तेत आली त्यामुळे एक सुवर्ण पान उलगडलं गेलं. कोणत्याही नेतृत्वासाठी, पक्षासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. पडत्या आणि वाईट काळात संघटन आणि नेतृत्व कसं आहे हे कळतं. तसंच ते सत्तेत असतानाही कळतं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. अशा काळात त्यांच्या सारखा मुख्यमंत्री झाला नसता हे त्यांनी त्यांच्या कार्याने दाखवून दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. कोरोनाला पळवून लावलं असं देशभरातील नेते सांगत होते. तेव्हा एकमेव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातत्याने दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. त्यांनी लोकांना विश्वासत घेतलं आणि त्यांना या लाटेविरोधात तयार केलं, असं त्या म्हणाल्या. (shiv sena leader urmila matondkar slams bjp over ED action)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 July 2021 https://t.co/KaFtfP4IhJ #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 12, 2021
संबंधित बातम्या:
त्यांच्या पायाखालची वाळू सरकतेय, माझ्यावर पाळत ठेवली जातेय, नाना पटोलेंचे गंभीर आरोप
भाषण सुरु असतानाच अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा सौम्य झटका, उपचारानंतर प्रकृती स्थिर
(shiv sena leader urmila matondkar slams bjp over ED action)