शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या एसटी बसेसवर “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून केल्या रवाना…
गेल्यावर्षी बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता. कन्नड संघटना आणि कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषिकांनाही डिवचण्याचा प्रयत्न वारंवार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना बंगळुरूत करण्यात आली.
पुणे- कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना घडल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकाराचे पडसाद राज्यभरात उमटण्यात येत असून पुण्यात देखील शिवसेनेच्यावतीने निषेध व्यक्त करण्यात आला. पुणे शहर शिवसेनेच्यावतीने कर्नाटकच्या अनेक बसेसना भगव्या रंगाने “छत्रपती शिवाजी महाराज की जय” लिहून व जयजयकार करून पुण्यातून कर्नाटकला राज्यात पाठवल्या आल्या. स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण चित्रपटगृहासमोरिल खाजगी बस पार्किंगमध्ये उभ्या असणार्या कर्नाटक डेपोच्या अनेक एसटी बसेसला काळे फासत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कन्नड संघटनानाकडून मराठी भाषिकांनाही डिवचण्याचा प्रयत्न
गेल्यावर्षी बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला होता. कन्नड संघटना आणि कर्नाटक सरकारकडून वारंवार मराठी भाषिकांनाही डिवचण्याचा प्रयत्न वारंवार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना बंगळुरूत करण्यात आली. तेथील भाजप सरकारचा छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचा द्वेष हा वारंवार जाहीर होत आहे.
निवडून यायच आणि नंतर शाई फेकायची निवडणूका जवळ आल्या की भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण होते. निवडणूकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानेच मते मागायची, . हि यांची निती आहे. हे आता बंद झाले पाहिजे. पुणे महापालिकेची निवडणूक आली असल्यामुळे भाजप उद्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमीपूजन करत आहेत. पाच वर्षापूर्वी पुतळा बसविण्याची घोषणा करून पुढच्या निवडणुकीसाठी भूमीपूजन केले जात आहे. शिवसृष्टी विषयी तोंडातून ‘ब्र’ पण काढत नाहीत. भाजप पुणेकरांची अजून किती फसवणूक करणार आहेत? अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी संजय मोरे यांनी दिली.
यावेळी शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, असंघटित कामगार सेनेचे अनंत घरत, उपशहरप्रमुख बाळासाहेब मालुसरे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, विभागप्रमुख सुरज लोखंडे, अशोक हरणावळ, मनीष जगदाळे, युवा सेनेचे युवराज पारीख, श्रीनाथ विटेकर, प्रसाद काकडे, विजय जोरी, संदीप गायकवाड, चंदन साळुंके, हर्षद ठकार, मुकेश दळवे, दिलीप पोमान, नंदू येवले, नितीन रावलेकर, राजेश मांढरे, गणी पठाण, सागर साळुंके उपस्थित होते.
Nagpur Health | दातांच्या आरोग्यकडं द्या लक्ष, मुलांसाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम
Traffic Police | Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती! वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं