शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी, रोहित पवार यांनी केली राज्य शासनाकडे मागणी

पुणे शहराची सिस्टर सिटी असलेल्या सॅन जोस शहरातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी झाली. ही बातमी येताच त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी, रोहित पवार यांनी केली राज्य शासनाकडे मागणी
शिवाजी महाराजांचा चोरीस गेलेला पुतळाImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Feb 08, 2023 | 2:34 PM

न्यूयॉर्क : उत्तर अमेरिकेत एका उद्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Statue) एकमेव पुतळा चोरीला गेला आहे. पुणे शहरातील सिस्टर सिटी म्हणून ओळख असलेल्या कॅलिफोर्नियाच्या सॅन जोस शहरातील (Pune’s Sister City) उद्यानात ही घटना घडली.येथील गुआदाल्युप रिव्हर पार्कमधून हा पुतळा चोरीला गेला आहे. सॅन जोसच्या उद्यान विभागाने शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तपास सुरु केली आहे. आता या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत.

पुणे शहराची सिस्टर सिटी असलेल्या सॅन जोस शहरातून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी झाली. ही बातमी येताच त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘सिस्टर सिटी’ मोहिमेअंतर्गत पुणे शहराने अमेरिकेतील सॅन जोस शहराला शिवाजी महाराजांचा पुतळा दिला. हा पुतळा सॅन जोस शहरातील उद्यानात बसवण्यात आलेला होता.

परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याची झालेली चोरी संतापजनक आहे. हा आपल्या आणि तेथील मराठी जनतेच्या भावनेचा विषय आहे. याबाबत लवकर तपास करून दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी राज्य सरकारने भारतीय परराष्ट्र खात्याकडे करावी, ही विनंती.

पुणे येथून गेलो होत पुतळा

पुणे शहराने सॅन जोस शहराला भेट म्हणून दिला होता. सॅन जोस शहर हे पुणे शहरासारखे आहे. दोन्ही शहरांमधील अनेक गोष्टीत साधर्म्य आहे. दोन्ही शहरांना समुद्ध वारसा आणि इतिहास आहे. दोन्ही शहरे शिक्षणाचे केंद्र आहेत. यामुळे सॅन जोस या शहराची ओळख पुणे सिस्टर सिटी म्हणून झाली.

परिणामी शिवाजी महाराजांचा पुतळा पुणे शहराकडून भेट म्हणून सॅन जोस शहराला देण्यात आला होता. उत्तर अमेरिकेत असलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकमेव पुतळा होता.या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे सॅन जोस शहरातील नागरिकांना खूप दुःख झाले आहे. आता या संदर्भात माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल, असेही उद्यान विभागाने केलेल्या ट्‌विटमध्ये म्हटले आहे.

जनतेला केले आवाहन

अमेरिकेत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची चोरी झाल्यामुळे शिवप्रेमी दु:खी झाले आहे. त्याची दखल स्थानिक पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी यासंदर्भात तपासासाठी जनतेला सहकार्याचे आवाहन देखील केले. पोलिसांनी जनतेकडून माहिती मागवली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.