कुख्यात गुंड गजा मारणेला शिवाजीनगर न्यायालयाकडून जामीन मंजूर

शिवाजीनगर सत्र न्यायालयाने गजा मारणेला जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गजा मारणे आणि त्याच्या ,साथीदारांना जामीन मंजूर केला आहे.

कुख्यात गुंड गजा मारणेला शिवाजीनगर न्यायालयाकडून जामीन मंजूर
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 10:46 PM

पुणे : हत्येच्या आरोपातून मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा मारणेला मंगळवारी पुणे पोलिसांनी अटक केली होती. बुधवारी शिवाजीनगर सत्र न्यायालयाने गजा मारणेला जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर गजा मारणे आणि त्याच्या ,साथीदारांना जामीन मंजूर केला आहे. तळोजा कारागृहातून सुटल्यावर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून गजा मारणेने पुणे शहरात रॉयल एन्ट्री केली होती. त्यामुळे पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती.(Shivajinagar Sessions Court grants bail to goon Gaja Marne)

पुणे पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांना आज शिवाजीनगर न्यायालयात हजर केलं होतं. त्यावेळी शिवाजीनगर सत्र न्यायालयानं त्यांना जामीन मंजूर केला आहे. रस्त्यात कोणत्याही पोलिसाने गजा मारणेला का अडवलं नाही? असा सवाल मारणेच्या वकिलांनी न्यायालयात विचारला.

सोमवारी तळोजा कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर त्याची पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. अगदी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जवळपास तीनशे ते पाचशे चारचाकी गाड्या घेऊन ही मिरवणूक निघाली. यावेळी मारणेचे साथीदार द्रुतगती महामार्गावर थांबून आरडाओरडा करुन दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत होते.

गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

पुण्यातील दोन हत्या प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर कुख्यात गुंड गजा मारणेची तळोजा येथील कारागृहातून सुटका झाली होती. यावेळी मारणेने 300 गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक काढली. या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं होतं. तुरुंगातून सुटल्यानंतर मिरवणूक काढणे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा प्रकार असल्याचं देसाई म्हणाले.

नेमकं काय घडलं?

कुख्यात गुंड गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले.

2014 पासून तुरुंगात

गुंड गजा मारणे याच्यावर 2014 मधील दोन हत्या प्रकरणात कारवाई करण्यात आली होती. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणी मारणे आणि समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी त्याला येरवडा जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

संबंधित बातम्या :

कुख्यात गुंड गजानन मारणेविरोधात पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हा दाखल

VIDEO | गुंड गजानन मारणेच्या साथीदारांचा एक्स्प्रेस वेवर हलकल्लोळ, पोलिसांनी ड्रोन जप्त करताच पळापळ

Shivajinagar Sessions Court grants bail to goon Gaja Marne

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.