देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं आणि टिकवलं; पण हे सरकार खोडा घालतंय: शिवेंद्रराजे
साताऱ्यात आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते. (shivendra raje bhosle reaction on Maratha reservation)
सातारा: कुणी मान्य करा अथवा नका करू. पण माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि टिकवलं, पण हे सरकार आरक्षणात खोडा घालतंय, अशी टीका छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी आज केली. (shivendra raje bhosle reaction on Maratha reservation)
साताऱ्यात आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचा उद्घाटन सोहळा पार पडला. या फाऊंडेशनचे संस्थापक नरेंद्र पाटील यांनी आयोजित केलेल्या या सोहळ्याला छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती शिवेंद्रराजे भोसले एकाच मंचावर उपस्थित होते. बऱ्याच दिवसानंतर हे दोन्ही नेते एकाच मंचावर आल्याने ते काय बोलतात याकडे संपूर्ण राज्याचं लागलं होतं. यावेळी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवलं. आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनचे कार्य हे मराठा समाज एकत्र आणण्यासाठी होणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. नरेंद्र पाटील यांना आपण साथ दिली पाहिजे, असं शैलेंद्रराजे म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिलं हे सर्वांना मान्य करावं लागेल. फडणवीसांनी नुसतं आरक्षण दिलं नाही तर ते कोर्टातही टिकवलं होतं. नंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात गेलं. पण मात्र राज्य सरकारला ते टिकवता आलं नाही, असं ते म्हणाले. एखाद्या पक्षाचा सदस्य म्हणून मी बोलत नाही. ही माझी भावना आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आरक्षणावरून टोलवाटोलवी सुरू आहे
राज्य सरकार जाणीवपूर्वक मराठा आरक्षणाला खोडा घालण्याचं काम करत आहे. आरक्षणावरून टोलवाटोलवी सुरू आहे. खरं तर याला जबाबदार आपणच आहोत. कारण आपल्यात एकी नाही, असंही ते म्हणाले. (shivendra raje bhosle reaction on Maratha reservation)
राजकारण गजकरण झालंय: उदयनराजे
यावेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांनीही राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. मराठा आरक्षणावर सरकारचं लक्ष नाही. कोर्टात यांचा वकील उपस्थित राहत नाही. हे सर्व जाणीपूर्वक केल्यासारखं वाटतंय. उद्या मराठा समजात उद्रेक झाला तर त्याला थांबवणार कोण? सा सवाल करतानाच मराठा आरक्षणाबाबतचे राजकारण थांबलच पाहिजे, असं उदयनराजे म्हणाले. सध्या राजकारण गजकरण झालं आहे. सरकारला कोणती भाषा कळते तेच कळत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. कुणाचंही आरक्षण काढून आम्हाला देऊ नका. आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या, अशी मागणीही त्यांनी केली. (shivendra raje bhosle reaction on Maratha reservation)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/MWpgKkoGmd
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 28, 2021
संबंधित बातम्या:
LIVE | खासदार उदयनराजे भोसले यांचे भाषण लाईव्ह
मंत्री वडेट्टीवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा क्रांती मोर्चा आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मेट्रो कमेंट’ला अजित पवारांचं खास ‘दादा स्टाईल’ने उत्तर
(shivendra raje bhosle reaction on Maratha reservation)