संघाचे हिंदुत्व तरी भाजपला मान्य आहे का? ते पत्र वाचून उद्धव ठाकरे यांनी भाजपला दाखवला आरसा
Uddhav Thackeray in pune: बाळासाहेब देवरस यांचे पत्र काढा. त्यासंदर्भातील पुस्तक आहे. त्यांचा आणीबाणीला पाठिंबा दिला होता, हे सुद्धा तुम्हाला कळेल. सध्या अब्दालीचा राजकीय वंशज वळवळवतोय ना. त्यांना आता विचारा. तुम्हाला संघाचे हिंदुत्व मान्य आहे की नाही?
शिवसेना उबाठा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यात शिवसैनिकांचा संकल्प मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला. हिंदुत्वावरुन भाजपवर जोरदार हल्ले केले. यावेळी त्यांनी भाजपला संघाचे हिंदुत्व काय आहे? ते सांगितले. त्यासाठी बाळासाहेब देवरस यांचे पत्र काढा. त्यासंदर्भातील पुस्तक आहे. त्यांचा आणीबाणीला पाठिंबा दिला होता, हे सुद्धा तुम्हाला कळेल. सध्या अब्दालीचा राजकीय वंशज वळवळवतोय ना. त्यांना आता विचारा. तुम्हाला संघाचे हिंदुत्व मान्य आहे की नाही? देवरसांनी मुस्लिमांची बाजू घेतली. हे हिंदुत्व मान्य आहे की नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी भाजपला विचारला.
हे देवरस यांना आधीच कळाले होते
मराठी माणसात भांडणे लावली जात आहे. समाजासमाजात भांडणे लावली जात आहे. आम्ही असले काम करत नाही. अब्दाली हे तुमचे हिंदुत्व असेल तर आम्ही तुमच्या हिंदुत्वाला मानत नाही. भाजपला आता संघाचे हिंदुत्व नकोय. देवरसांनी खुर्ची लोलूप नेतृत्वावर भाष्य केले होते, असे नतद्रष्ट संघाचा उपयोग करून सत्तेत येतील हे देवरस यांना आधीच कळले होते की काय हे त्यांच्या लेखावरून स्पष्ट होत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
आमचे हिंदुत्व हे साधूसंतांचे
आमचे हिंदुत्व हे साधूसंतांचे आहे. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आम्ही हर हर महादेव म्हणणारे आहोत. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता. पण औरंगजेबाचे पाय चाटत होता. तसेच गद्दार आपल्याकडून तिकडे गेले. गद्दारांनीच घात केला. त्याही काळात मिर्झा राजे प्रचंड समुद्रासारखे सैन्य घेऊन आला होता. या राजाचा जीव सिंहासनात नाही तर रयतेत अडकलेला आहे हे त्याला कळलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात न लावणारा हा राजा आहे, हे त्याला माहीत होते. म्हणून त्याने रयतेची कत्तल सुरू केली. त्यामुळे महाराजांकडे पर्याय नव्हता. त्यामुळे ते शरण गेले.
शिवाजी महाराज आग्र्याला गेले. परत आले. तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. राज्य नव्हते, गड किल्ले नव्हते. तसाच आपला पक्ष चोरला आहे. चिन्ह चोरले आहे. माझ्या वडिलांचा फोटो चोरला आहे. पण आता शिवाजी महाराजांची ती जिद्द आपण घ्यायला पाहिजे. म्हणूनच आपण महाराजांची पूजा करत असतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
हे ही वाचा…
मी ढेकणांच्या नादी लागत नाही, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांवर नाव न घेता हल्ला