Pune School | पुण्यात शाळा सुरु कराव्या की नाही? चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना फॉर्म्युला सांगितला
पुण्यातील शाळा सुरु कारण्याबाबतचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या उद्या होणाऱ्या बैठकीत होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे. शहरातील कोरोनाची स्थिती, लसीकरण यासारख्या सर्व बाबींचा विचार करून शाळांचा निर्णय होईल.
पुणे- एकीकडे पुण्यात गेल्या पावणे दोन वर्षातील कोरोनाची (corona)उच्चांकी वाढ झाल्याची नोंद झाली आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्या वाढत असतानाच दुसरीकडे शहरातील शाळा (Pune School) सुरु करायच्या की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. शाळा सुरु करण्याबाबत भाजप आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Pat) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy CM Ajit Pawar) यांना सल्ला दिला आहे. कोरोनाची रुग्णासंख्या वाढत असली तरी शहरातील शाळा सुरु कराव्या लागणार आहे. त्यासाठी आठवड्यातून एक दिवस शाळा, विद्यार्थ्यांचे स्लॉट पाडावेत ज्या वर्गात 40 विद्यार्थी संख्या आहे तिथे 10 विद्यार्थ्यांना बोलवावे. अभ्यासक्रम कामे करावेत शहरतील शाळा सुरु करण्याच्या आधी नियम ठरवावेत अशी विनंतीही त्यांनी अजित पवार यांना केली.ओमिक्रॉनचे रुग्ण वाढले तरी उद्योगधंदे सुरूच राहले आहेत. असे मत चंद्रकांत पाटीलांनी व्यक्त केलं आहे.
शाळा सुरु करण्याचा निर्णय उद्या होणार
पुण्यातील शाळा सुरु कारण्याबाबतचा निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या उद्या होणाऱ्या बैठकीत होणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहळ यांनी दिली आहे. शहरातील कोरोनाची स्थिती, लसीकरण यासारख्या सर्व बाबींचा विचार करून शाळांचा निर्णय होईल. शाळा सुरु करत असताना पालक , डॉक्टर, टास्क फोर्स यांची मतं विचारात घेतली जाणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. शहरात सद्यस्थितीला कोरोना बाधित 64 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
आयुक्त विक्रम कुमार कोरोना पॉझिटिव्ह
शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा कोरोना रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लसीचे दोन डोस घेतल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह कोरोना आला आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी टेस्ट करून घ्यावी असे आवाहन त्यांनी केलं आहे.
Ganesh Tekdi temple | नागपुरातील गणेश टेकडी मंदिरात मुलं, ज्येष्ठांना प्रवेश बंद, कारण काय?
Uddhav Thackeray यांनी Top 5 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये पटकावलं चौथं स्थान
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेची तारीख जाहीर