पुणे : मुळा-मुठा नद्यांच्या (Mula Mutha River) शुद्धिकरणासाठी आणि शहरातल्या सांडपाण्यावर प्रक्रिया (Sewage Treatment) करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या जायका (JICA Project) प्रकल्पासाठी 6 मोठ्या कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत. जायका प्रकल्पासाठी निविदा भरण्याची मुदत संपल्यानंतर सहा कंपन्यांनी या प्रकल्पासाठी रस दाखवल्याचं समोर आलं आहे. सर्व कंपन्यांच्या कागदपत्रांची छाननी केल्यानंतर सर्वात कमी रक्कम कोणत्या कंपनीने प्रस्तावित केली आहे हे स्पष्ट होणार आहे. पण छाननी होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. (Six companies have submitted tenders for the Jica project of water purification in Pune)
पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) मुळा-मुठा नद्यांच्या शुद्धिकरण प्रकल्पाअंतर्गत अकरा मैलापाणी शुद्धिकरण केंद्रे उभारण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. जपानच्या जायका कंपनीच्या मदतीने हा प्रकल्प केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी’ने (जायका) अल्प व्याजदराने कर्ज दिलं आहे. हे कर्ज केंद्र सरकार फेडणार आहे.
2015 मध्ये हा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. पण वेगवेगळ्या कारणांमुळे हा प्रकल्प सहा वर्षांपासून कागदावरच आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत गेला आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सहा कंपन्यांनी महापालिकेच्या प्रक्रियेला प्रतिसाद देत निविदा भरल्या आहेत. या कंपन्यांची कागदपत्र दिल्ली आणि चेन्नईहून पुण्यात आणली गेली आहेत. तांत्रित मूल्यांकनासाठी ही सगळी कागदपत्रं प्रकल्पाच्या सल्लागाराकडे देण्यात आली आहेत. त्यानंतर ही कागदपत्रं सल्लागार समितीसमोर ठेवली जातील. या समितीने निर्णय घेतल्यानंतर आर्थिक निविदा उघडण्यात येतील. या प्रक्रियेला साधारण एक महिन्याचा कालावधी लागू शकतो.
मे. टाटा प्रोजेक्ट्स प्रा. लि. आणि पी. अँड सी. प्रोजेक्ट्स कन्सोरशिअम
मे. एनव्हायरो कंट्रोल आणि तोशिबा वॉटर सोल्यूशन्स जेव्ही
मे. व्ही. ए. टेक वाबाग आणि पी. सी. आय. एल-जेव्ही
मे. एल अँड टी आणि के. आयपीएल जेव्ही
मे. जेएमसी आणि मेटीटोव अल्के जेव्ही
मे. जे. डब्लू. आय. एल. आणि एसएसजी आणि एसपीएम जेव्ही
संबंधित बातम्या :