AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Problems : वाढत्या तापमानाचा पुणेकरांना ताप! त्वचेच्या समस्या वाढल्या, वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात…

लहान मुलांमध्ये त्वचेचा कोरडेपणा आणि उष्म्यामुळे काटेरी पुरळ उठण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या मुलांना पालकांनी सैल तसेच सुती कपडे घालावे. त्याचबरोबर थंड खोलीत राहणे आणि घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन (Sunscreen lotion) लावणे अशी खबरदारी घेतल्यास काही प्रमाणात मदत होईल.

Skin Problems : वाढत्या तापमानाचा पुणेकरांना ताप! त्वचेच्या समस्या वाढल्या, वैद्यकीय तज्ज्ञ म्हणतात...
उन्हाळा आणि त्वचाविकार (प्रातिनिधिक छायाचित्र)Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 7:30 AM

पुणे : ढगाळ हवामानामुळे मध्यंतरी काही प्रमाणात चटका देणारे ऊन कमी झाले होते. मात्र या उन्हामुळे त्वचेच्या विविध समस्या (Skin problems) पुणेकरांना भेडसावत आहेत. या उन्हाळ्यात शहरातील अति उष्णतेमुळे अनेक लहान मुले, किशोरवयीन आणि प्रौढांना त्यांच्या त्वचेवर उष्णतेचे (Heat) फोड आणि पुरळ उठताना दिसत आहेत. एका तरुणीने सांगितले, की उष्णतेमुळे डोक्यात छोटे पुरळ आले आहेत. त्यामुळे अंघोळ करताना, केसांना स्वच्छ करताना त्रास होतो. तर त्याच्याच भावाच्या पाठीवर असेच पुरळ आले आहेत. या विषयातील तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांमध्ये त्वचेचा कोरडेपणा आणि उष्म्यामुळे काटेरी पुरळ उठण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या मुलांना पालकांनी सैल तसेच सुती कपडे घालावे. त्याचबरोबर थंड खोलीत राहणे आणि घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लोशन (Sunscreen lotion) लावणे अशी खबरदारी घेतल्यास काही प्रमाणात मदत होईल.

उष्णता कमी करणाऱ्या पदार्थांचे सेवन

मुलांची त्वचा संवेदनशील असते. मुलांनी योग्य खबरदारी न घेतल्यास त्वचेवर जळजळ होऊ शकते. बहुतेक वेळा, काही पेयांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे शरीराला संक्रमणास अधिक संवेदनाक्षम बनवते आणि उष्णता उफाळून येते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दररोजच्या आंघोळीसह चांगली स्वच्छता राखताना, घामामुळे कोंडा आणि छिद्र रोखण्यासाठी केस नियमित धुणे आवश्यक आहे. शरीरातील उष्णता कमी करणारे पदार्थ आणि पेये यांचे सेवन केल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते.

हायड्रेटेड राहिल्याने समस्येचा त्रास कमी

रक्तातील साखरेच्या पातळीत वाढ झाल्यामुळे थेट फोड होत नाहीत, परंतु त्यामुळे शरीराला उष्णतेच्या फोडांसह संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. लाल मांस, मूळ भाज्या, चरबीयुक्त पदार्थ यांसारखे अन्न टाळावे. त्यासोबतच हायड्रेटेड राहिल्याने शरीराला उष्णतेचे फोड होण्यापासून वाचवण्यास मदत होते, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक

उन्हाळ्यात, जास्त आर्द्रतेमुळे, त्वचेवर छिद्रे अडकल्यामुळे उष्णतेचे पुरळ उठतात. अशा समस्या टाळण्यासाठी औषधीयुक्त टॅल्कम पावडर आणि अशा उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये वाढ होत असते. मात्र अशी उत्पादने वापरण्याआधी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते. अन्यथा त्याचे दुष्परिणामही जाणवू लागू शकतात.

...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह.
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की.