Vande Bharat Express | पुणे स्टेशनवरुन धावणार वंदे भारत स्लीपर कोच?

Vande Bharat Express | वंदे भारत एक्स्प्रेस देशात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. विविध राज्यातून ही एक्स्प्रेस सोडण्याची मागणी वाढत आहे. आता वंदे भारत सेमीहायस्पीड ट्रेनला स्लीपर कोच जोडले जाणार आहे. ही ट्रेन पुणे स्टेशनवरुन धावणार आहे.

Vande Bharat Express | पुणे स्टेशनवरुन धावणार वंदे भारत स्लीपर कोच?
वंदे भारत ही ट्रेन सध्या प्रवाशांसाठी सोईची ठरत आहे. सध्या या रेल्वेत केवळ सिटिंग चेअरच उपलब्ध आहेत. पण आता लवकरच या रेल्वेचं स्लीपर कोच व्हर्जन येणार आहे.
Follow us
| Updated on: Oct 23, 2023 | 2:16 PM

पुणे | 23 ऑक्टोंबर 2023 : वंदे भारत (Vande Bharat Train ) एक्स्प्रेस अल्पवधीत देशवासियांची पसंत ठरल आहे. या रेल्वेने वेगवान आणि आरामदायक प्रवास होत असल्यामुळे या गाडीची मागणी वाढत आहे. आता देशभरात 34 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु आहेत. लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसची ही संख्या 200 पर्यंत नेण्यात येणार आहे. वंदे भारत सेमी हायस्पीड ट्रेनमुळे भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलला आहे. सध्या महाराष्ट्रातून चार वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत. आता वंदे भारतची स्लीपर कोच येत आहे. ही ट्रेन पुणे रेल्वे स्टेशनवरुन धावणार आहे.

पुणे शहरातून कुठे धावणार

प्रवासाचा कमी वेळ, चांगल्या सुविधा आणि वाजवी भाडे यामुळे विमान प्रवासापेक्षा अनेक जण वंदे भारत एक्स्प्रेसला प्राधान्य देतात. वंदे भारत एक्स्प्रेसमुळे काही मार्गांवर विमान कंपन्यांनी भाडे कमी केले आहे. देशभरात लोकप्रिय झालेल्या या ट्रेनमध्ये स्लीपर कोच सुरु होणार आहे. ही ट्रेन पुणे ते बेंगळुरु दरम्यान असणार आहे. मार्च 2024 पर्यंत स्लीपर वंदे भारत सुरु होण्याची शक्यता आहे.

कशी असणार स्लीपर वंदे भारत

स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये 16 कोच असणार आहेत. त्यात दोन कोच विमानच्या धर्तीवर असणार आहे. त्या कोचमधून किती वजन घेऊन जात येईल, हे निश्चित असणार आहे. वंदे भारत स्लीपरमध्ये 11 एसी टियर असून त्यात 611 सीटे असणार आहेत. 4 एसी टियर-2 मध्ये 188 बर्थ असतील. एक फर्स्ट एसी असणार असून त्यात 24 बर्थ असणार आहेत. एकूण 823 सीट या ट्रेनमध्ये असणार आहेत.

हे सुद्धा वाचा

2030 पर्यंत 800 वंदेभारत

रेल्वे मंत्रालयाने 2030 पर्यंत 800 वंदेभारत सुरु करण्याचे नियोजन केले आहे. या रेल्वेचा कमीत कमी वेग 160 असणार आहे. पुणे स्टेशनवरुन स्लीपर वंदे भारत सुरु होण्यापूर्वी पुणे ते सिकंदराबाद अशी वंदे भारत एक्स्प्रेस सुरु होणार आहे. पुणे ते सिंकदराबाद शताब्दी सुपरफास्ट एक्स्प्रेसला पर्याय म्हणून ही वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. शताब्दी एक्स्प्रेस पुणे ते सिकंदराबाद प्रवास 8.25 तासांत पूर्ण करते. वंदे भारतला त्यापेक्षा कमी कालावधी लागणार आहे.

Non Stop LIVE Update
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा
'लाडक्या बहिणी'चे भाऊ चीटर, मनसे नेत्याचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा.
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?
'गुवाहाटीला जाण्याची गरज नाही तर...', संजय शिरसाट नवा प्रदेश शोधणार?.
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?
निकालासाठी 2 दिवस बाकी, एक्झिट पोलनंतर राजकीय पक्षांकडून हॉटेलवारी?.
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'
निकालाआधीच बच्चू कडूंचा मोठा दावा, 'आमच्याशिवाय सत्ता स्थापन....'.
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?
परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला धुतलं, मुंडेंच्या समर्थकांकडून मारहाण?.
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?
निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर BJP अ‍ॅक्शन मोडवर, कोणाला साधणार संपर्क?.
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी
'तू जिंदगी भर याद..',ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी.
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?
राज्यात 65.02 टक्के मतदान, तुमच्या भागात किती जणांनी बजावला हक्क?.