पुण्यात घटस्फोटासाठी जातपंचायतऐवजी न्यायालयात गेल्यानं बहिष्कार, अंनिसच्या पाठपुराव्यानं 14 जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील वाकड भागात घटस्फोटासाठी जातपंचायतऐवजी न्यायालयात दावा दाखल केल्यानं जातपंचायतीने मुलाच्या कुटुंबियांना वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जातपंचायतीनं सागरे कुटुंबियांना पावणे तीन वर्षांपासून समाजातून बहिष्कृत केलं. त्यामुळे जातपंचायतीचे पाटील, पंच यांच्यासह 14 जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.

पुण्यात घटस्फोटासाठी जातपंचायतऐवजी न्यायालयात गेल्यानं बहिष्कार, अंनिसच्या पाठपुराव्यानं 14 जणांवर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 6:11 PM

पुणे : पुण्यातील वाकड भागात घटस्फोटासाठी जातपंचायतऐवजी न्यायालयात दावा दाखल केल्यानं जातपंचायतीने मुलाच्या कुटुंबियांना वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या जातपंचायतीनं सागरे कुटुंबियांना पावणे तीन वर्षांपासून समाजातून बहिष्कृत केलं. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून जातपंचायतीचे पाटील, पंच यांच्यासह 14 जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. जातपंचायतीचे पाटील आणि पंच म्हणून मुलीचे आजोबा, मामा हे काम पाहत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातच हा गुन्हा दाखल झाला.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आकुर्डी पुणे शाखेच्या पुढाकाराने हा गुन्हा दाखल झाला आहे. सागरे कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने पोलिसांकडे केली होती.

नेमकं काय घडलं?

सीताराम सागरे यांचा 1 जानेवारी 2013 रोजी शितल भोरे यांच्याशी लग्न झालं. मार्च 2018 मध्ये नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाले. कुटुंबीय नातेवाईक हे पत्नी शीतल हिला माहेरी घेऊन गेले. सागरे यांनी पत्नी शीतल भोरे यांच्यापासून अलिप्त होण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात डिसेंबर 2018 मध्ये दावा दाखल केला आहे. मात्र, जातपंचायत ऐवजी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केल्याने सागरे कुटुंबियांना पावणे तीन वर्षांपासून जातपंचायतीच्या हुकुमावरून समाजातून बहिष्कृत करण्यात आले. जातीचे ठराविक लोक पंच म्हणून काम करत असून त्यातील मुख्य पंचाला पाटील म्हणण्याची प्रथा आहे.

सागरे कुटुंबातील कार्यक्रमांना कुणाला येऊ दिले जात नाही

विशेषतः पत्नी शीतल यांचे आईचे वडील अर्थात आजोबा करेप्पा मारुती वाघमारे आणि मामा बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे हे जातपंचायतीचे पाटील म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पुढाकारानेचे सागरे कुटुंबियांना समाजातून बहिष्कृत करून अमानवीय वागणूक देण्यात आली. सागरे कुटुंबियांशी कुणी संबंध ठेवू नये, ठेवल्यास त्यांनाही वाळीत टाकू असे फर्मान जातपंचायतीने काढले. सागरे कुटुंबियांना समाजातील, नात्यातील सुखदुःखाच्या प्रसंगात सहभागी करून घेतले जात नाही. त्यांच्याही कार्यक्रमांना कुणाला येऊ दिले जात नाही. वाळीत टाकण्याबाबत सागरे कुटुंबीयांनी जातपंचायतीचे पाटील आणि पंचांना विचारणा केली असता वाळीत टाकण्याचे कृत्य योग्यच असल्याचे त्यांचं मत आहे.

जातपंचायतीच्या बैठकीचे फोटो काढले म्हणून मारहाण

मिटिंगचे फोटो काढले असता सीताराम सागरे यांना पंचांनी मारहाण केली असून त्यांचा चष्मा फोडला. सागरे कुटुंबियांशी गावाला कुणी बोलत नाही. घरच्या कार्यक्रमाला कुणी येत नाही. सागरे कुटुंबियांकडून दरवर्षी घेतली जाणारी जीवगंता वर्गणीही घेतली जात नाही. तसेच त्या वर्गणीचे समाजात वाटप होते. मात्र ते वाटप सागरे कुटुंबियांना दिले जात नाही. चुलत्यांनी लग्न पत्रिकेत सीताराम सागरे यांच्या वडिलांचे नाव टाकले म्हणून त्यांचीही वर्गणी घेतली जात नाही, अशी कृत्य जातपंचायतीच्या हुकुमावरून घडत आहेत.

महाराष्ट्र अंनिसची भूमिका

महाराष्ट्र अंनिसने म्हटलं, “आजपर्यंत दोन जातीतल्या अत्याचारांच्या विरोधात अनेक लढे झाले आहेत. परंतु एकाच जातीतल्या पुढारी लोकांनी जातबांधवांवर केलेल्या अत्याचाराविरोधात संघटितपणे लढा झाला नव्हता. राज्यात तो लढा प्रथमच महाराष्ट्र अंनिसने उभारला. महाराष्ट्र अंनिसच्या लढ्यामुळे बहुतांश जातींमध्ये जातपंचायतचे अस्तित्व असल्याचे निदर्शनास आले. महाराष्ट्र अंनिसच्या पाठपुराव्यामुळे 3 जुलै 2017 रोजी राज्यात सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा लागू झाला. महाराष्ट्र हे असा कायदा करणारे देशातील पहिले राज्य ठरले. 4 वर्षात या कायद्यांर्गत 150 गुन्हे राज्यात दाखल झाले आहेत. राज्यात कोकण वगळता जिल्ह्यात सर्वाधिक 15 गुन्हे या कायद्यांतर्गत दाखल झाले आहेत.”

“सागरे कुटुंबियांसंदर्भातील 16 वा गुन्हा दाखल झाला आहे. अंनिसच्या संवादी भूमिकेमुळे आणि पुढाकाराने राज्यातील 17 जातपंचायती बरखास्त झाल्या आहेत. परंपरेने काही लोक जातपंच होतात. काही समाजात पंचांना देवाचा अवतार समाजला जातो. किंबहुना तसा गैरसमज जाणीवपूर्वक करून दिला जातो. त्यामुळे त्यांचा शब्द अंतिम समजला जातो. पंच आपल्या समाजातील व्यक्तींचे जीवनमान नियंत्रित करतात. जन्मापासून ते मरणापर्यंतच्या महत्त्वाच्या घटनांवर ते नियंत्रण ठेवतात. ते कायदे बनवितात, स्वतःच न्यायनिवाडे करतात व स्वतःच शिक्षा करतात. त्यांचे न्यायनिवाडे अंधश्रद्धेवर आधारित असतात,” असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितलं.

“दंडाची बेहिशेबी रक्कम पंच स्वतःसाठी वापरतात”

“पंचांच्या शिक्षा अघोरी व अमानुष असतात. शारीरिक किंवा दंडाच्या स्वरूपात शिक्षा करून, तर कधी समाजबांधवाचा जीव घेऊन किंवा जीव देण्याची मानसिकता तयार करून पंच समाजबांधवांवर वचक निर्माण करतात. दंडाची बेहिशेबी रक्कम पंच स्वतःसाठी वापरतात. शिक्षा करताना अनेकदा ते जात बहिष्कृत करण्याचे सर्वात मोठे शस्त्र उगारतात. आणि हे सर्व करता जातपंचायती या देशांतील प्रचलित संविधानिक कायदे आणि नैसर्गिक न्यायचे तत्व डावलून, समांतर न्यायव्यवस्था शोषणकारी पद्धतीने राबवितात. याने व्यक्तीच्या मूलभूत स्वातंत्र्यावरच गदा येते. त्यामुळे जातपंचायतीच्या कारभाराला आमचा ठाम विरोध आहे,” अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र अंनिसने घेतलीय.

सखोल तपास करुन दोषींवर कठोर कारवाई करा, अंनिसची मागणी

“सागरे कुटुंबियांशी जातपंचायतीच्या हुकुमावरून अमानवीय वर्तन घडले आहे. जातपंचायतीचे पाटील आणि पंचांसह 14 जणांविरोधात वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, त्याबद्दल पोलिसांना खूप खूप धन्यवाद ! पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या जातपंचायतीमुळे अन्य कुणी पीडित झाले असेल त्यांनाही तक्रार दाखल करण्यासाठी आवाहन करावे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा,” असं आवाहन अंनिसच्या कायदा विभागाच्या अॅड. मनिषा महाजन आणि विशाल विमल यांनी केलंय.

करेप्पा मारुती वाघमारे, बाजीराव करेप्पा वाघमारे, साहेबराव करेप्पा वाघमारे, बाळकृष्ण करेप्पा वाघमारे (सर्व रा. वाल्हेकरवाडी), मोहन शामराव उगाडे (रा. ताथवडे), मनोज सागरे, विजय सागरे (रा. वारजे माळवाडी) रामदास भोरे (रा. हिंजेवडी), अमर भोरे, महादेव भोरे (रा. मुंबई), मारुती वाघमारे (रा. उरळीकांचन), विष्णू वाघमारे (उडगी, अक्कलकोट), अमृत भोरे, गोविंद भोरे (रा. मुंबई) या 14 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सिताराम कृष्णा सागरे (वय 33 वर्षे, रा. वाकड ) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

दाभोलकरांच्या हत्येला 8 वर्षे, मात्र मुख्य सूत्रधारांना शोधण्यात अपयश, अंनिसकडून ठिकठिकाणी निदर्शनं

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश हत्या आणि नालासोपारा स्फोटक प्रकरणाचा एकमेकांशी संबंध : मुक्ता दाभोलकर

कौमार्य चाचणीचा मुद्दा अभ्यासक्रमात असल्यानं अंनिस आक्रमक, अखेर विद्यापीठाने विषय वगळला

Social boycott of a Family in Wakad Pune for filing divorce in court

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.