सोलापूर | 6 जानेवारी 2024 : सोलापूरकराच्या आनंदात भर घालणारी बातमी आहे. सोलापूरकरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी गिफ्ट दिली आहे. सोलापूरकरांना नव्या वर्षात 45 किलोमीटरच्या रिंग रोडचं गिफ्ट देण्यात आलं आहे. सोलापूरकरांसाठी रिंग रोड खुला करण्यात आला आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या वेळेची बचत होणार आहे. तसेच आर्थिक बचतही होणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोलापूरकरांना नव्या वर्षात 45 किलोमीटरचा रिंग रोडचं गिफ्ट देण्यात आलं आहे. नव्या रिंगरोडचा कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्यविषयक सुविधांसाठी उपयोग होणार आहे. सोलापुरातील जड वाहतूक कायमची हद्दपार करण्यासाठी शहराबाहेरून रिंग रोडची मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर या रिंग रोडचं काम सुरू करण्यात आलं होतं.
लोकांची मागणी पाहता शहराच्या बाहेरून रिंग रोडचे काम 2022 पासून सुरू होते ते आता पूर्ण झाले आहे. रिंग रोड आता वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे. या रिंग रोडमुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक बचत देखील होणार आहे. या कॉरिडोरच्या प्रकल्पात केगाव ते हगलूर अशा 45 किलोमीटरच्या रिंग रोडची निर्मिती करण्यात आली आहे. या रिंगरोडमुळे अनेक फायदे होणार आहेत. एकूण पाच शहरांना हा रिंगरोड जोडला गेला आहे. जिल्ह्यातील केगाव, देगाव, बेलाटी, कवठे, सोरेगाव, कुंभारी, दोड्डीसह अनेक गावेही या रोडमुळे जोडल्या गेले आहेत.
ओझोनलँड एमईपी सोलापूर रिंग रोड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला या रिंगरोडचं काम देण्यात आलं होतं. हे काम विक्रमी वेळेत पूर्ण झालं आहे. त्यामुळे या परिसरातील विकासात मोठी भर पडणार आहे. पाच शहरांशी हा रोड जोडला गेल्याने सोलापूरचा आर्थिक चेहरामोहरा बदलून जाणार आहे. विकासाचे अनेक प्रकल्प शहरात निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच दळणवळणाच्या नव्या साधनामुळे विकास प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यताही बळावली आहे.
रिंगरोडमुळे सोलापूरच्या लगत असलेले पाच विभाग सोलापूर शहराशी जोडले जाणार आहेत. त्यामुळे कनेक्टिव्हीटी वाढणार आहे. या प्रकल्पात 2-लेन/4-लेन महामार्ग बांधण्याचा अंतर्भाव आहे. पूल आणि कल्व्हर्टचे रुंदीकरण तसेच पुनर्वसन, फूटपाथ बांधणे आदी गोष्टी या प्रकल्पातून पूर्ण होणार आहेत, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमय प्रताप सिंग म्हणाले.