ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान, पण त्यापूर्वीच उमेदवारास ह्रदयविकाराचा झटका

grampanchayat election maharashtra 2023 | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शुक्रवारी संपला. प्रचार तोफा थंडवण्याच्या दिवशी धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. यामुळे निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान, पण त्यापूर्वीच उमेदवारास ह्रदयविकाराचा झटका
grampanchayat electionImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 04, 2023 | 3:22 PM

रवी लव्हेकर, पंढरपूर | 4 नोव्हेंबर 2023 : राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी प्रचार तोफा शुक्रवारी संध्याकाळी थंडावल्या. त्यानंतर उमेदवार विजयाच्या आराखडे तयार करु लागले. आजचा दिवस आणखी छुपा प्रचार सुरु राहणार आहे. त्यानंतर आता रविवारी मतदान होणार आहे. सोमवारी निवडणूक निकाल लागणार आहे. त्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी करणाऱ्या व्यक्तीस ह्रदयविकाराचा झटका आला. त्यात त्याचा मृत्यू झाला. यामुळे या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. मतदानाच्या एका दिवसापूर्वी घडलेल्या या प्रकारामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

सांगोला तालुक्यातील चिक महूद ग्रामपंचायतीत घटना

सांगोला तालुक्यातील चिक महूद ग्रामपंचायतची निवडणूक पाच नोव्हेंबर रोजी होणार आहे. इतर ग्रामपंचायतीप्रमाणे या ठिकाणी प्रचार चांगलाच रंगला होता. शुक्रवारी प्रचार तोफा थंडावल्यानंतर उमेदवार थोडे निवांत होते. विजयाचे गणित तयार करत होते. यावेळी ही निवडणूक लढवत असलेले उमेदवार किसन सोपान यादव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. किसन यादव यांना त्रास जाणवू लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक रिंगणात

किसन यादव हे उद्धव ठाकरे यांची शिवसेना व शेकाप यांच्या तामजाई देवी परिवर्तन ग्रामविकास आघाडी कडून निवडणूक लढवत होते. अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागेवरुन ते निवडणूक लढवत होते. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मृत्यू झाल्याने सांगोला तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. किसन यादव यांचा मृत्यू झाल्यामुळे प्रभाग पाचमधील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव सदस्य पदाची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. एखाद्या उमेदवाराचे निधन झाल्यानंतर त्या ठिकाणची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेतो. त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.