मोहिते पाटील गटाच्या 6 जणांचं सदस्यत्व राहणार की जाणार? निर्णय जिल्हाधिकाऱ्यांकडे!
सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या 6 सदस्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. | Solapur ZP
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या 6 सदस्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने हे प्रकरण निकाली काढून जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केलंय. मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात मोहिते गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. (Solapur ZP 6 members of Mohite Patil group remain members or not? Decision solapur Collector)
डिसेंबर 2019 मध्ये जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळेस मोहिते पाटील गटाचा सहा सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आदेश डावलुन विरोधी गटाच्या उमेदवारांना मतदान केलं होतं. त्या सहा सदस्यांवर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई करण्याची राष्ट्रवादीची मागणी होती.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दाखल केली होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू असताना मोहिते पाटील गटाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी या कारवाईबाबत निर्णय घेणार आहेत.
काय आहे प्रकरण?
सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत माळशिरस तालुक्यातील मोहिते-पाटील गटाच्या राष्ट्रवादीच्या सहा सदस्यांनी भाजप आणि समविचारी गटाला मतदान केलं होतं. त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेत महाविकासआघाडीचा प्रयत्न फसला आणि भाजप तसेच समविचारी गटाला अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद मिळालं. राष्ट्रवादीने या सहा सदस्यांनी पक्षाविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी केली होती. तर सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार केली होती.
माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य स्वरुपाराणी मोहिते-पाटील , शितलादेवी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, मंगल वाघमोडे ,सुनंदा फुले ,गणेश पाटील या सदस्यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे मोहिते पाटील गटाच्या या सहा जिल्हा परिषद सदस्यांना अपात्र करण्याची मागणी राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आली होती.
(Solapur ZP 6 members of Mohite Patil group remain members or not? Decision solapur Collector)
हे ही वाचा :