Eknath Shinde : पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा, चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी

मुख्यमंत्र्यांनी या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सर्व अधिकाऱ्यांना या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अधिकारी आज चांदणी चौकाची पाहणी करून याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.

Eknath Shinde : पुणेकरांनी अडवला मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा, चांदणी चौकातल्या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी
मुख्यमंत्र्यांना निवेदन/चांदणी चौकातील कोंडीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 27, 2022 | 9:53 AM

पुणे : पुण्यात होत असणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे (Traffic jam) पुणेकर त्रासलेले दिसत आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसापासून पुणेकरांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशातच पुण्यातील चांदणी चौकात तासन् तास वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. चांदणी चौकातील या वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावा, असे साकडे पुणेकरांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना घातले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल रोडमार्गे साताऱ्याला जात असताना खुद्द मुख्यमंत्र्यांचा ताफा चांदणी चौकाच्या वाहतूक कोंडीत अडकला. त्यावेळी स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदनदेखील दिले. ही समस्या आम्हाला रोज जाणवत आहे. त्यामुळे चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहतूक कोंडीवर काहीतरी मार्ग काढा, अशी विनंती स्थानिकांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.

तोडगा काढण्याचे आदेश

मुख्यमंत्र्यांनी या अनुषंगाने पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या सर्व अधिकाऱ्यांना या वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अधिकारी आज चांदणी चौकाची पाहणी करून याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहेत.

स्थानिक नागरिक त्रस्त

पुणे शहरातील चांदणी चौकात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून काम सुरू आहे. या फ्लायओव्हरच्या कामामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे वाहनधारक तसेच स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. याचसंदर्भात स्थानिक प्रवाशांनी थेट साताऱ्याला जात असताना वाटेतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधत आपले गाऱ्हाणे मांडले.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांना निवेदन

सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी करणार पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्थानिक प्रवाश्यांच्या समस्या ऐकून तत्काळ चांदणी चौकातील वाहतूक कोंडी संदर्भात पुणे महापालिका आयुक्त, पिपंरी चिंचवड पोलीस आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, नॅशनल हायवे प्राधिकरण आणि राज्याचे मुख्य सचिव यांना फोन करून प्रवाश्यांची समस्या दूर करण्यास सांगितले. त्यानुसार आज सकाळी 11.30 दरम्यान चांदणी चौकात संबंधित सर्व आस्थापनांचे वरिष्ठ अधिकारी येऊन पाहणी करणार आहेत. पाहणी करून झाल्यावर प्रवाश्यांना भेडसावत असलेल्या समस्या कशाप्रकारे सोडवता येतील, याचा अहवाल तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला जाणार आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.