Pune Corona ground report : पुण्यात सक्रिय रुग्ण 52 हजार, ऑक्सिजन बेड 45, ICU बेड शून्य

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्याची अक्षरशः दैना उडवून टाकलीये. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नाहीत, चाचण्यांचे अहवाल (रिपोर्ट) वेळेवर येत नाहीत, औषधे मिळत नाहीत.

Pune Corona ground report : पुण्यात सक्रिय रुग्ण 52 हजार, ऑक्सिजन बेड 45, ICU बेड शून्य
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 12, 2021 | 4:40 PM

पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पुण्याची अक्षरशः दैना उडवून टाकलीये. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नाहीत, चाचण्यांचे अहवाल (रिपोर्ट) वेळेवर येत नाहीत, औषधे मिळत नाहीत. अशा स्थितीत आत्तापर्यंत 4 जणांचे बेड मिळाला नाही म्हणून मृत्यू झालेत, तर रेमडिसिव्हरसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट थांबायचं नाव घेत नाहीये. पुण्याचे कारभारी मात्र, यावर काहीच बोलायला तयार नाहीयेत. पाहुयात पुण्यातील कोरोना परिस्थितीचा हा विदारक रिपोर्ट (Special report on Pune Corona situation and medical facilities in city for patients).

कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यातला पहिला रुग्ण हा पुण्यातच सापडला होता. त्यानंतर यावर्षी फेब्रुवारीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली अन पुण्यातल्या आरोग्य यंत्रणेची अक्षरशः लक्तरे निघालीत. पुण्यातील कोरोना रुग्ण, उपलब्ध बेड यावर नजर टाकली की आरोग्य यंत्रणेचं हे भयाण वास्तव दिसतं.

एकूण सक्रिय कोरोना रुग्ण – 52 हजार 476

उपलब्ध ऑक्सीजन बेड – 45

उपलब्ध व्हेंटिलेटर बेड – 00

उपलब्ध आयसीयू बेड – 00

उपलब्ध ऑक्सिजन विरहित आयसोलेशन बेड – 743

आकडेवारीवरुन शहरातील विदारक परिस्थिती उघड 

हे आकडे पाहिले की लक्षात येत शहरातील परिस्थिती किती विदारक आहे. त्यातच बेड मिळत नसल्याने होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या 4 कोरोना बाधितांना घरातच जीव सोडावा लागलाय. एकीकडे बेड नाही म्हणून घरात जीव सोडावा लागतोय, तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये बेड मिळून सुद्धा रेमडिसीव्हर मिळत नाही म्हणून रुग्ण गंभीर होतोय. रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनसाठी शेकडो किलोमीटर वणवण भटकटायेत.

रेमडिसीव्हरबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कागदावरच

रेमडिसीव्हर मिळत नसल्याने त्याचा काळाबाजार थांबविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे औषध रुग्णाला थेट हॉस्पिटलमध्येच उपलब्ध होईल असे आदेश काढले. मात्र, हे आदेश कागदावरच आहेत. हॉस्पिटलमध्ये इंजेक्शन मिळत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेडिकल बाहेर गर्दी करतायेत. अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त लावून गर्दी हटवली जातीये.

शहरातील रेमडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान 5 दिवस लागणार

दरम्यान, शहरातील रेमडिसीव्हर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी अजून किमान 5 दिवस लागणार आहेत. सोमवारी रात्रीपर्यंत 5 हजार रेमडिसीव्हर पुण्यात येतील, त्यानंतर कोविड हॉस्पिटलमध्ये त्याचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही. एस. प्रतापवार यांनी दिलीये. राज्यात रेमडिसीव्हर निर्मिती करणारी एकच कंपनी आहे. त्यात रेमडिसीव्हर इंजेक्शनची एक बॅच तयार करण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागतो. एका बॅचमध्ये 30 ते 35 हजार रेमडिसीव्हर इंजेक्शन तयार होतात.

एवढ्या विदारक परिस्थितीत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आठवड्याला आढावा बैठक घेऊन आदेश देतायेत, पण हे आदेश फक्त कागदावरच राहत असल्याचं वास्तव आहे.

हेही वाचा :

पुण्यात रेमेडेसिव्हीर इंजेक्शन हवंय ?, मग ‘या’ नंबरवर कॉल करा

पुण्यात कोरोनाचा कहर, रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसीची आकडेवारी काय? वाचा आयुक्तांची माहिती

Corona Vaccination | पुण्यात लसीकरणाला आणखी गती मिळणार, 86 केंद्र वाढवण्याचा निर्णय

व्हिडीओ पाहा :

Special report on Pune Corona situation and medical facilities in city for patients

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.