Pune Railway | दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्यासाठी या विशेष रेल्वे, आरक्षण आताच करा…

Pune Railway | नवरात्र उत्सवास आजपासून सुरुवात झाली. नवरात्र आणि दसऱ्यानंतर दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक जण गावी जात असतात. गावी जाणाऱ्या लोकांसाठी पुणे रेल्वे स्थानकावरुन विशेष रेल्वे सुरु करण्यात आली आहे.

Pune Railway | दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावी जाण्यासाठी या विशेष रेल्वे, आरक्षण आताच करा...
Follow us
| Updated on: Oct 15, 2023 | 3:11 PM

पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : पुढील दीड ते दोन महिने गावी जाणाऱ्यांची गर्दी असणार आहे. या गर्दीमुळे रेल्वे आरक्षण मिळत नाही. गर्दीचा फायदा घेऊन दिवाळीत बस प्रवास प्रचंड महागलेला असतो. यामुळे गावी जाणाऱ्या लोकांसाठी सुट्यांमध्ये विशेष रेल्वे पुणे स्टेशनवरुन सोडण्यात येणार आहे. या विशेष रेल्वेच्या २८ फेऱ्या असणार आहेत. या रेल्वेचे बुकींग सुरु झाले आहे. यामुळे दिवाळीत आपल्या गावी जाणाऱ्यांची सोय होणार आहे. विशेष रेल्वेपैकी एक गाडी संपूर्ण वातानुकूलित आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी या रेल्वेला थांबा देण्यात आला आहे.

संपूर्ण वातानुकूलित गाडी

  • 02141 आणि 02142 ही गाडी संपूर्ण वातानुकूलित आहे. एकूण 20 डबे असणारी ही गाडी पुण्यावरुन सुटल्यानंतर दौंड, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, धामनगाव, वर्धा स्टेशनवर थांबणार आहे.
  • 17 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान 02141 ही विशेष गाडी दर मंगळवारी दुपारी 03.15 वाजता पुणे स्टेशनवरुन सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे 04.50 वाजता अजनी रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहचणार आहे.
  • 18 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर दरम्यान विशेष गाडी 02142 दर बुधवारी अजनी स्टेशनवरुन संध्याकाळी 7.50 वाजता सुटेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 11.35 वाजता पुणे रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहचणार आहे.

पुणे – गोरखपूर ही सुपरफास्ट ट्रेन

  • पुणे – गोरखपूर ही सुपरफास्ट ट्रेन 20 ऑक्टोबर ते 1 डिसेंबर या कालावधीत धावणार आहे. 01431 क्रमांक असलेली ही गाडी प्रत्येक शुक्रवारी दुपारी 04.15 वाजता पुणे स्टेशनवरुन सुटणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी रात्री 9.00 वाजता गोरखपूरला ही रेल्वे पोहचणार आहे.
  • गोरखपूरवरुन 01432 क्रमांकाची ही विशेष गाडी 21 ऑक्टोबर ते 2 डिसेंबर दरम्यान धावणार आहे. प्रत्येक शनिवारी रात्री 11.25 वाजता गोरखपूरवरुन ही गाडी सुटणार आहे. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी 6.25 वाजता पुणे रेल्वे स्थानकावर पोहचणार आहे.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात कुठे थांबणार

ही गाडी महाराष्ट्रात दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. या गाडीला 21 कोच असणार आहे. विशेष रेल्वेचे आरक्षण रविवार 15 ऑक्टोंबरपासून सुरु होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.