महाविकास आघाडी काळात फक्त घोषणा, काम विद्यमान सरकार करतंय, श्रीकांत शिंदे यांचा दावा
मात्र हे सरकार आल्यानंतर तीन महिन्यात जास्त काम करण्याचं काम या सरकारने केले.
पुणे : पुण्यातील शिरूर येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतली. यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले, पाणी योजना ही खूप मोठी योजना आहे. जसे हर घर शौचालय तशीच हर घर जल ही योजना आहे. प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणी कसे पोहोचेल अशी योजना आहे. यामुळे 50 टक्के योगदान राज्य सरकार देते. देशात अजून खूप गावे आहेत त्याठिकाणी पाणी मिळत नाही.
मी राजकीय काही बोलत नाही. मात्र हे सरकार आल्यानंतर तीन महिन्यात जास्त काम करण्याचं काम या सरकारने केले. हे सरकार सतत काम करत आहे, असंही श्रीकांत शिंदे म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री रोज लोकांमध्ये फिरून काम करत आहेत. मागच्या वेळी फक्त घोषणा झाल्या आणि या केलेल्या घोषणाची अंमलबजावणीचं काम हे सरकार करत आहे.
कधीही कोणी विचार केला नव्हता की, ही दिवाळी मुख्यमंत्री वर्षावर शेतकऱ्यांसोबत साजरी करतील. म्हणून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद होता. पुढील येणाऱ्या काळामध्ये चांगली काम केली जातील.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, या योजना करताना लोकसंख्येचा विचार करून योजना करत आहेत. मोदींनी लोकांसाठी मोठ्या योजना आणत लोकांना त्याचा फायदा होईल, याचा विचार केला.
पुढील दोन वर्षात निवडणुका होतील. तोपर्यंत आपल्याला विकास कामांचा वेग वाढविला पाहिजे. पश्चिम भागातील शेतकऱ्यांना कर्ज माफीचा फायदा होत नाही. मात्र आता नियमित कर्ज भरणाऱ्याला आपण सूट देणार आहोत.
सत्ता परिवर्तन होईल का नाही, तसं पावसाचं गणित झालं आहे. पाऊस झाल्यावर शेतीचे नुकसान होतंय. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी प्रयत्न करत आहोत. नुकसान भरपाईचा दर वाढविला आहे. तात्काळ पंचनामे करून भरपाई दिली. खूप योजना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आणल्यात.
हा भाग उसाचा क्षेत्र असलेला आहे. कारखाने आहेत त्यातून शेतकऱ्याला उसाला कसा भाव जास्त देत येईल, हे आपण पाहतोय. उसाचा एमआरपी आणि इथेनॉलचे दर कसे देता येतील, ते आम्ही पाहत आहोत, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.