दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे हॉल तिकीट…

SSC Exam | बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाचा बदल केला आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून झालेल्या मागणीनुसार परीक्षाचा वेळ दहा मिनिटांनी वाढवून दिला आहे. तसेच बोर्डाने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले आहे.

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, परीक्षेचे हॉल तिकीट...
यामुळेच पूर्वीच्या नियोजनानुसार 10 जानेवारी ऐवजी 17 जानेवारीला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थी या परीक्षेच्या निकालाची वाट पाहत आहेत.
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 8:15 AM

अभिजित पोते, पुणे, दि.30 जानेवारी 2024 | दहावी, बारावीच्या मुलांसाठी फेब्रवारी, मार्च महिना महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. यावर्षांपासून राज्य शिक्षण मंडळाने काही महत्वाचे बदल केले आहेत. हे बदल विद्यार्थ्यांसाठी फायद्याचे ठरणार आहे. आता बोर्डाने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले आहे. दहावीच्या परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून (३१ जानेवारी) विद्यार्थ्यांना मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठीचे प्रवेश पत्र ऑनलाईन उपलब्ध होणार आहे.

कधीपासून आहे परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बुधवारपासून दहावीचे हॉल तिकीट जारी करणार आहे. आता दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी आणि तोंडी परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तसेच लेखी परीक्षेला 26 मार्चपासून सुरुवात होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना उद्यापासून हॉल तिकीट देण्यात येणार आहे. या हॉल तिकीटासाठी कुठलेही अतिरिक्त शुल्क घेऊ नये, असे आदेश बोर्डाने विद्यालयांना दिले आहेत.

यंदापासून हा बदल

बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्वाचा बदल केला आहे. विद्यार्थी आणि पालकांकडून झालेल्या मागणीनुसार परीक्षाचा वेळ दहा मिनिटांनी वाढवून दिला आहे. तसेच परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्धातास आधी परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. म्हणजे सकाळी ११ वाजता परीक्षा सुरु होणार असेल तर विद्यार्थ्यांना १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे. तसेच दुपारी ३ वाजता परीक्षा असेल तर विद्यार्थ्यांना २.३० वाजता परीक्षा केंद्रावर यावे लागणार आहे, असे परीक्षा मंडळातर्फे कळवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

सीबीएसईकडून असा बदल

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत काही बदल करण्यात आले. सीबीएसई बोर्ड आता विद्यार्थ्यांना गुणांची टक्केवारी देणार नाही. तसेच श्रेणीसुद्धा देणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा वाढू नये, यामुळे हा निर्णय घेतला आहे. महाविद्यालयात प्रवेश घेताना संबंधित शैक्षणिक संस्था गुण किंवा श्रेणी विद्यार्थ्यांना देणार आहे. तसेच नोकरीसाठी संबंधित संस्था टक्केवारी काढणार आहे.

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.