बारावीनंतर दहावीच्या गणिताच्या पेपरात विघ्न, शाळेमधील प्रकारानंतर पोलिसात गुन्हा दाखल

पुण्यात दहावीच्या गणित भाग एकचा पेपर सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळला होता. १३ मार्चला गणित भाग एकचा पेपर राज्यभरात झाला होता.

बारावीनंतर दहावीच्या गणिताच्या पेपरात विघ्न, शाळेमधील प्रकारानंतर पोलिसात गुन्हा दाखल
दुकानाचे शटर तोडून मोबाईलची चोरी
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 12:16 PM

पुणे : बारावीच्या गणिताच्या पेपरफुटी प्रकरण शांत होत नाही तोपर्यंत दहावीच्या गणिताचा नवीन प्रकार समोर आला आहे. बारावी गणिताचा पेपर विद्यार्थ्यांना एक तास आधीच मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. बारावीचा गणिताचा पेपर फुटल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस पथकाकडे देण्यात आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात काही जणांना अटक केली आहे. आता दहावीच्या पेपरसंदर्भात पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. हा पेपर सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये सापडला आहे.

नेमके काय झाले

पुण्यात दहावीच्या गणित भाग एकचा पेपर सुरक्षारक्षकाच्या मोबाईलमध्ये आढळला होता. १३ मार्चला गणित भाग एकचा पेपर राज्यभरात झाला होता. यावेळी पुणे येथील बिबवेवाडी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयात सुरक्षा रक्षकाच्या मोबाईलमध्ये पेपर सापडला. १५ मार्चला बोर्डाचे पथक तपासणीसाठी विद्यालयात गेले असता आरोपी महिलेवर पथकाचा संशय आला.

हे सुद्धा वाचा

या विद्यालयात सुरक्षा रक्षक असलेल्या मनीषा कांबळे यांनी परीक्षा हॉलमध्ये जाऊन पेपरचे फोटो काढले होते. यावेळी तिच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असता गणित भाग एक प्रश्न पत्रिकेचे फोटो काढल्याचे समोर आले. पथकाने तातडीने मनीषा कांबळीची चौकशी केली. त्यावेळी तिने उडवाउडविची उत्तर दिली. त्यामुळे अखेर पथकाकडून बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी किसन भुजबळ यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.

बारावीच्या प्रकरणात यांना अटक

बारावीच्या गणिताच्या पेपर प्रकरणात किरण संदीप दिघे, अर्चना बाळासाहेब भामरे, भाऊसाहेब लोभाजी अमृते, वैभव संजय तरटे, सचिन दत्तात्रय महारनवर या आरोपींना यापूर्वीच अटक झाली आहे. दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेच्या तक्रारीवरून याप्रकरणी मुंबईतील शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

गुन्हे शाखेच्या तपासात दादरमधील विद्यार्थ्यांला नगरमधील आरोपींकडून प्रश्नपत्रिका मिळाल्याचे समोर आले होते. यापूर्वी या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी 5 मार्चला अहमदनगर येथून एका संशयीताला ताब्यात घेतले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.