अमेरिकेतील मोठ्या कंपनीची कमान ‘लक्ष्मण’ यांच्यांकडे, काय आहे पुणे अन् लक्ष्मण यांचा संबंध
पुणे शहरात राहून उच्च पदावर पोहचलेले अनेक अधिकारी आहेत. जगभरात पुणे शहराचा झेंडा फडकवणारे अनेक जण आहेत. आता त्यात आणखी एका नावाची भर पडली आहे. पुणे शहरातून ज्ञानार्जनाचे करणारा व्यक्ती मल्टीनॅशनल कंपनीचे सीईओ झाले आहेत.
पुणे : जगभरात भारतीय वंशाचे लोक आपल्या कर्तुत्वाने अनेक शिखरे सर करत आहेत. मग पंतप्रधानपदापासून मल्टीनॅशनल कंपन्यांच्या सीईओ पदाची जबाबदारी या लोकांना सांभाळण्यास मिळत आहे. या यादीत आणखी एकाने भर पडली आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती आणि पुणे शहर यांचा चांगलाच संबंध आहे. पुणे शहरातून त्यांनी ज्ञानार्जनाचे कार्य पूर्ण केले आहे. यामुळे पुणेकरांना अभिमान वाटणारी ही घटना घडली आहे.
भारतीय वंशाचे लक्ष्मण नरसिंहन यांनी सोमवारी स्टारबक्स या मोठ्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे CEO पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या यशामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्च पदांवर असलेल्या जागतिक व्यावसायिक नेत्यांच्या यादीत आणखी एक नाव जोडले गेले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, स्टारबक्सने नरसिंहन हे कंपनीचे पुढील मुख्य कार्यकारी अधिकारी असणार असल्याची घोषणा केली होती. स्टारबक्स ही कॉफी हाऊसची कंपनी आहे.
स्टारबक्सने लक्ष्मण यांच्या नियुक्तीसंदर्भात एक निवेदन काढले आहे. त्यात म्हटले आहे की लक्ष्मण नरसिंहन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच लक्ष्मण कंपनीच्या संचालक मंडळात असणार आहेत. 23 मार्च रोजी स्टारबक्सची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार असून त्या बैठकीचे नेतृत्व लक्ष्मण करणार आहेत.
काय आहे पुण्याशी संबंध
लक्ष्मण यांनी पुणे विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. त्यांनी पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्यानंतर पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील लॉडर इन्स्टिट्यूटमधून जर्मन आणि इंटरनॅशनल स्टडीजमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स आणि पेनसिल्व्हेनिया युनिव्हर्सिटीच्या व्हार्टन स्कूलमधून फायनान्समध्ये मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन देखील आहे.ते रेकिट बेंकिसरचे माजी सीईओ आहेत. त्यांना ई-कॉमर्स कंपन्यांमधील 30 वर्षांचा अनुभव आहे.
यापूर्वी बंगा यांचे पुणे कनेक्शन
अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी जागतिक बँकेच्या प्रमुख पदासाठी अजय बंगा यांच्या नावाची शिफारस केली. ६३ वर्षीय बंगा यांचा जन्म महाराष्ट्रातील पुण्यात झाला. त्यांचे वडील हभजनसिंग बंगा भारतीय लष्करात होते. ते लेफ्टनंट जनरल पदावरुन निवृत्त झाले. पुण्यातील खडकी कॅन्टोन्मेंट येथे तैनात होते, त्यावेळी अजय यांचा जन्म झाला. त्यांचे मूळ कुटंब पंजाबमधील जालंधरचे आहे. शालेय शिक्षणानंतर अजय बंगा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी IIM अहमदाबादमधून एमबीए केले.
जागतिक बँकेचे होणारे प्रमुख अजय बंगा यांचे काय आहे पुणे कनेक्शन..वाचा सविस्तर