Ganesh Naik case : इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गणेश नाईकांवर गुन्हा दाखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या…

भाजपा नेते (BJP Leader) आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे.

Ganesh Naik case : इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी गणेश नाईकांवर गुन्हा दाखल, रुपाली चाकणकर म्हणाल्या...
रुपाली चाकणकरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 17, 2022 | 4:06 PM

पुणे : भाजपा नेते (BJP Leader) आणि आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांच्यावर पीडितेच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. एका महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर गणेश नाईक यांनी झालेल्या अपत्याचा स्वीकार केला नाही. यासंबंधी पीडितेने तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या या तक्रारीनुसार आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वी या महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्याप्रकरणी आयोगाने नवी मुंबई पोलिसांना यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर पोलिसांनी आज गणेश नाईक यांच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकी देणे व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवणे हे गुन्हे दाखल केले आहेत. गणेश नाईक यांना याप्रकरणी तत्काळ अटक करण्याची कार्यवाहीदेखील लवकरच केली जाईल, असेही चाकणकर म्हणाल्या.

आणखी एक मंत्री…

राज्यात माजी मंत्री संजय राठोड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला. त्यानंतर आता भाजपा आमदार आणि माजी मंत्री गणेश नाईक यांच्यावरही लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. 1993पासून गणेश नाईक यांनी एका महिलेला लग्नाचे आमिष देत, तसेच जीवे मारण्याची धमकी देत लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला.

काय आहे प्रकरण?

राज्य महिला आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील एका महिलेनं ऐरोलीचे भाजपा आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात केलेला तक्रार अर्ज महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला प्राप्त झाला. त्यात पीडित महिलेने तक्रार केली आहे. गणेश नाईक यांच्यासोबत पीडिता 1993पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या संबंधातून त्यांना 15 वर्षाचा मुलगा आहे. या महिलेने त्यांचे वैवाहिक अधिकार तसेच त्यांच्या मुलाकरता पितृत्वाचा अधिकार मागितला असता गणेश नाईक यांनी या महिलेला आणि मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

आणखी वाचा :

Raj Thackeray : अशा “लवंड्यांना” म्हणत राज ठाकरेंकडून संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर, भोंग्यांवरूनही पुन्हा बजावलं

Raj Thackeray Vs Ajit Pawar : मशिदींवरच्या भोंग्यावरून राज ठाकरेंची भूमिका ‘जशास जशी’; तर अजित पवार म्हणतात…

Nandurbar : डाकीण असल्याच्या संशयावरून महिलेचा विवस्त्र करून छळ, प्रथेच्या नावाखाली नंदूरबारमध्ये धक्कादायक प्रकार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.