Khashaba Jadhav | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव यांचा पुतळा, लवकरच प्रक्रिया पूर्ण होणार

ऑलम्पिकमध्ये देशाला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा पुणे विद्यापीठातील क्रीडा संकुलात पुतळा उभारला जाणार आहे. त्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाच्या (Pune University) क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

Khashaba Jadhav | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खाशाबा जाधव यांचा पुतळा, लवकरच प्रक्रिया पूर्ण होणार
KHASHABA JADHAV
Follow us
| Updated on: Jan 16, 2022 | 12:05 PM

पुणे : ऑलम्पिकमध्ये देशाला पहिलं वैयक्तिक पदक मिळवून देणारे कुस्तीपटू खाशाबा जाधव (Khashaba Jadhav) यांचा पुणे विद्यापीठातील क्रीडा संकुलात पुतळा उभारला जाणार आहे. त्या दृष्टीने विद्यापीठ प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचबरोबर विद्यापीठाच्या (Pune University) क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांच नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत क्रीडा संकुलासाठी विद्यापीठानं 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये क्रीडा संकुलाचा इनडोअर विकास करण्यात येत आहे.

पुणे विद्यापीठीत खाशाबा जाधव यांचा पुतळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठमध्ये देशाचे पहिले ऑलम्पिक वीर तसेच कराडचे पैलवान खाशाबा जाधव यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची कायदेशीर प्रक्रियाा सुरु करण्यात आली आहे. विद्यापीठातील क्रीडा संकुलात हा पुतळा उभारला जाणार आहे. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाला खाशाबा जाधव यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. विद्यापीठाने आतापर्यंत क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 50 कोटी रुपये खर्च केले आहेत. यामध्ये सुशोभिकरण तसेच वेगवेगळ्या खेळांच्या मैदानाची दुरुस्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाने खर्च केलेल्या 50 कोटी रुपयांपैकी काही रक्कम ही विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मिळालेली आहे. खाशाबा जाधव यांनी ऑलिम्पिकमध्ये देशाला वैयक्तिक खेळात पहिले पदक देऊन संपूर्ण महाराष्ट्राची मान उंचावली. त्यांच्या या कार्याची दखल तसेच भावी खेळाडूंना त्यांचा पुतळा एक प्रेरणा ठरवा म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय.

पद्म पुरस्कार न मिळाल्यामुळे मुलाने व्यक्त केली होती नाराजी

दरम्यान, मागील वर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. यावेळी खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली होती. खाशाबा जाधव यांची कामगिरी पद्म पुरस्कारासाठी पात्र नाही हे एकदा सरकारने जाहीर करावं, अशी उद्विग्न नाराजीची प्रतिक्रिया त्यावेळी रणजीत जाधव यांनी दिली होती.

इतर बातम्या :

चार महिन्यांपूर्वीपर्यंत कोहली सर्वात ताकदवान खेळाडू होता, मग या 4 कारणांमुळे संपूर्ण चित्र बदललं; म्हणून कर्णधारपद सोडले 

Virat Kohli Test Captaincy: कर्णधारपद सोडताच विराटवर टांगती तलवार, कसोटी संघात स्थान टिकणार का?

Lata Mangeshkar : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत अद्याप सुधारणा नाही, डाॅक्टर म्हणाले सर्वांनी प्रार्थना करा!

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.