pune mumbai expressway | पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार थांबणार, अशी केली उपाययोजना
pune mumbai expressway | मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरुन रोज हजारो वाहने जात असतात. या महामार्गावर अनेक वेळा दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. यामुळे हे प्रकार थांबवण्यासाठी एक प्रकल्प हाती घेतला आहे...
रणजित जाधव, पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दररोज हजारो वाहने जात असतात. डोंगरांमधून हा महामार्गवर काढण्यात आला असल्यामुळे दरड कोसळण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. त्यामुळे अपघात झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. पुणे-मुंबई महामार्ग देशातील टॉप 10 व्यस्त मार्ग आहे. तसेच या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होत असते. हा सर्व प्रकार लक्षात घेऊन प्रशासाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे या महामार्गावर दरड कोसळण्याचे प्रकार थांबणार आहे. यामुळे दरड कोसळल्यामुळे होणारे अपघातही रोखले जाणार आहे. त्याचवेळी सोमवारी मेगा ब्लॉकही घेण्यात आला. आयटीएमएस प्रोजेक्ट अंतर्गत आडोशी बोगद्याजवळ ओव्हर हेड ग्रँटी बसवण्यात येणार आहे.
काय सुरु करण्यात आले काम
23 जुलैला रात्रीच्या सव्वा दहाच्या सुमारास पाऊस सुरू होता. त्यावेळी पुण्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर मोठी दरड कोसळली होती. पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळण्याची घटना घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा जाळ्या बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरक्षा जाळ्या बसवल्या जाणार असल्यामुळे दरड कोसळण्याचे प्रकार थांबणार आहे. पुन्हा दरड कोसळू नये, यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा जाळ्या बसवण्याच काम सुरू करण्यात आले आहे.
रोज हजारो वाहनांची वर्दळ
पुणे-मुंबई महामार्गावर रोज हजारो वाहनांची वर्दळ असते. शनिवारी आणि रविवारी ही संख्या लाखांच्या घरात जाते. दरड कोसळण्याच्या घटनांमुळे मोठा अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे द्रुतगतीमार्गावरील पुणे लेनवर आयटीएमएस प्रोजेक्ट अंतर्गत आडोशी बोगद्याजवळ सुरक्षा जाळ्या बसवल्या जात आहेत. त्यासाठी सोमवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला.
पुन्हा घेतला मेगा ब्लॉग
पुणे-मुंबई एक्स्प्रेस मार्गावर पुन्हा मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान मेगा ब्लॉक घेऊन काम करण्यात आले. यावेळी मुंबईवरुन पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद करण्यात आली. केवळ हलक्या वाहनांसाठी खोपोली एक्झिटवरून जुन्या महामार्गावर वाहतूक वळवण्यात आली. शिंग्रोबा घाटातून ही वाहतूक वळवण्यात आली. उर्वरित जड वाहतूक खोपोली टोलनाक्यावर थांबवण्यात आली. यामुळे वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.