अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी मुदतवाढ, आज संध्याकाळपर्यंत घेऊ शकणार प्रवेश, वाचा सविस्तर
अकरावीसाठी (11th Admission) पहिल्या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका दिवसाची मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना आज संध्याकाळपर्यंत आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
पुणे : अकरावीसाठी (11th Admission) पहिल्या फेरीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एका दिवसाची मुदतवाढ (Extension) देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना आज संध्याकाळपर्यंत आपले प्रवेश निश्चित करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. एका दिवसाचा वाढीव वेळ मिळाल्याने आता पहिल्या फेरीत प्रवेश घेऊ न शकलेल्या कित्येक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, विद्यार्थ्यांना आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहेत. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीतल्या प्रवेशांसाठी काल संध्याकाळपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात आता एका दिवसाची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Students have been given a one-day extension to get admission for the eleventh)
अजूनही 9 ते 10 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी
पहिल्या फेरीत पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवडमधल्या (Pimpri Chinchwad) 22 हजार 665 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंती क्रमांकाचे महाविद्यालय जाहीर झाले आहे. या विद्यार्थ्यांना आता आज संध्याकाळपर्यंत कोणत्याही परिस्थितीत आपला प्रवेश निश्चित करणं बंधनकारक असणार आहे. आतापर्यंत पहिल्या फेरीत जाहीर झालेल्या 38 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 263 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. अजूनही 9 ते 10 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश बाकी आहेत. आज संध्याकाळपर्यंत या विद्यार्थ्यांचे प्रवेश होतील अशी शक्यता अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या सचिवांनी व्यक्त केली आहे.
जात प्रमाणपत्र सादर करण्यासंबंधी सूचना
राखीव गटातल्या विद्यार्थ्यांनी आरक्षण गटातून प्रवेशासाठी अर्ज केले आहेत. या विद्यार्थ्यांना संबंधित प्रवर्गातून प्रवेश घेण्यासाठी 30 दिवसांच्या आत जातीचं प्रमाणपत्र सादर करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला आहे, त्यांनी अर्जाची पोचपावती आणि सोबत वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांकडे स्वतःचं जात प्रमाणपत्र किंवा अर्जाची पोचपावती नाही, त्यांनी वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 30 दिवसांच्या आता आपलं जात प्रमाणपत्र सादर केलं नाही, त्यांचा प्रवेश रद्दा केला जाणार आहे.
नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ
यापूर्वी नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत देण्यात आली होती. ती वाढवून आता 30 दिवस करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश निश्चिती करताना सुरूवातीला नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठीच्या अर्जाची पावती सादर करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. पण त्यात विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर आता पालकांना 30 दिवसांच्या आत नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करू या आशयाच्या हमीपत्रावरही प्रवेश दिला जाणार आहे.
हमीपत्र दिल्यास प्रवेशाचा मार्ग मोकळा
पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) हद्दीतल्या विद्यार्थ्यांना जवळच्या ई-सुविधा केंद्रामध्ये नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. दरम्यान, ई-सुविधा केंद्रांनाही विद्यार्थ्यांची अडवणूक न करता तातडीने नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तरीही पालकांना काही अडचणी आल्या, प्रमाणपत्र अर्जाची पावती मिळाली नाही तर घाबरून न जाता पालकांनी हमीपत्र दिल्यास विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.
इतर बातम्या :