पुण्यातील जबरदस्त वाहतुकीत युवकाची गाडीवर स्टंटबाजी, Video व्हायरल होताच आता…
Pune Viral news | पुणे शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून वारंवार केले जातात. परंतु त्या नियमांना खो देण्याचा प्रकार होत असतो. आता पुणे शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शहरातून भरधाव जाणाऱ्या गाडीच्या छतावर बसून युवक स्टंटबाजी करत आहे.
रणजित जाधव, पिंपरी-चिंचवड, पुणे दि. 16 फेब्रुवारी 2024 | पुणे शहरातील वाहतुकीची चर्चा नेहमीच होत असते. देशातील सर्वाधिक वाहन असलेले पुणे शहर आहे. यामुळे वाहतूक कोंडी नेहमीचा विषय झाला आहे. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे प्रयत्न पोलिसांकडून वारंवार केले जातात. परंतु त्या नियमांना खो देण्याचा प्रकार होत असतो. आता पुणे शहरातील एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होत आहे. शहरातून भरधाव जाणाऱ्या गाडीच्या छतावर बसून युवक स्टंटबाजी करत आहे. या व्हिडिओत स्टंट करणारा युवक एखाद्या चित्रपटातील शुटींगप्रमाणे बसून डोलत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
कुठे घडला प्रकार
पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमधील हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पिंपरी- चिंचवडमधील एक स्टंटबाज युवकाचा हा व्हिडिओ आहे. सध्या सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा होत आहे. हा व्हिडिओत स्टंट करणाऱ्या तरुणावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होऊ लागली आहे. अत्यंत बिनधास्तपणे हा तरुण गाडीच्या टपावर बसलेला दिसतो. त्याला त्याला कुठलीच भीती नाही, असे व्हिडिओतून स्पष्ट होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओत जीवावर बेतेल अशा पद्धतीने धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून तरुण स्टंटबाजी करत आहे.
पुणे शहरात भरधाव गाडीवर बसून युवकाची स्टंटबाजी#Pune #Police pic.twitter.com/hAHloLEEZo
— jitendra (@jitendrazavar) February 16, 2024
तरुणाचा शोध सुरु
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्या तरुणाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. धावत्या चारचाकी गाडीच्या टपावर बसून स्टंटबाजी करणे या तरुणास चांगले महागात पडणार आहे. एखाद्या चित्रपटातील नायकाप्रमाणे गाडीच्या टपावर बसून हातवारे करताना तो व्हिडिओमध्ये दिसत आहे. या तरुणाचा शोध वाहतूक पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. त्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी दिली आहे.
हेल्मेट सक्तीची सुरुवात पोलिसांपासून
पुणे पोलीस आयुक्तांनी सर्व पोलिसांना हेल्मेट वापरण्याचे आदेश दिले आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. हेल्मेट न वापरल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्याचे आयुक्त अमितेश कुमार यांनी तंबी दिली आहे. पुण्याच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावरच त्यांनी हेल्मेट वापरण्याचे नागरिकांनाही आवाहन केले होते. त्याची सुरुवात त्यांनी पोलीस विभागातून केलीय.