बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांचा उमेदवार ठरला ? प्रचाराचा रथ फिरणार

Pune Baramati Lok Sabha Election | राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा बारामतीमधून लढणार आहे. तसेच महायुतीकडून अजित पवार गटास ही जागा मिळणार आहे. महायुतीकडून अजित पवार गटाकडून कोण असणार? हे निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहे.

बारामती लोकसभेसाठी अजित पवार यांचा उमेदवार ठरला ? प्रचाराचा रथ फिरणार
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 3:17 PM

प्रदीप कापसे, पुणे दि. 16 फेब्रुवारी 2024 | लोकसभा निवडणुकीचे वारे देशात वाहू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची तयारी चालवली आहे. उमेदवारी जाहीर झालेली नसली तरी काही ठिकाणी उमेदवार निश्चित झाले आहेत. त्यानुसार प्रचार सुरु झाला आहे. संपूर्ण राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष लागलेल्या बारामती मतदार संघातील लढत चांगलीच रंगणार आहे. कारण बारामतीमध्ये पवार कुटुंबियांमध्येच लढत होणार आहे. राष्ट्रवादीतील शरद पवार गटातील उमेदवार सुप्रिया सुळे पुन्हा लढणार आहे. तसेच महायुतीकडून अजित पवार गटास ही जागा मिळणार आहे. महायुतीकडून अजित पवार गटाकडून कोण असणार? हे निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहे. बारामतीमधून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे.

प्रचाराचा रथ तयार, कार्याची माहिती

बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा अजित पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहे. बारामतीमध्ये केवळ अधिकृत घोषणा बाकी आहे. बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांच्या माहिती व कार्याचा आढावा घेणारा प्रचार रथ फिरू लागला आहे. त्यासाठी गाडीवर फ्लॅक्स लावले आहे. त्यात सुनेत्रा पवार यांचा मोठा फोटो घेतला आहे. तसेच अजित पवार यांचाही फोटो आहे.

सुनेत्रा पवार यांनी अष्टविनायकाचे घेतले दर्शन

सुनेत्रा पवार सध्या चांगल्याच सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी राहुल कुल यांच्या घरी सदिच्छा भेट घेतली. राहुल कुल हे भाजपचे आमदार तर कांचन कुल 2019 साली भाजपच्या उमेदवार होत्या. दौंड तालुक्यातील राहू येथे सुनेत्रा पवार यांनी कुल कुटुंबियांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी अष्टविनायक महागणपती रांजणगाव येथे दर्शन घेत बाप्पाची आरती केली. गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांचा शिरूर लोकसभा मतदारसंघातील दौरा वाढला आहे. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना पराभूत करणार असे आव्हान दिल्यानंतर सुनेत्रा पवारही शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्या फिरताना दिसत आहे. अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना शिरूर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याची चर्चा आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.