Sunil Shelke : ‘बेताल वक्तव्ये करणाऱ्या तुषार भोसलेंना व्यासपीठावर स्थान, मात्र…’ देहूतल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर सुनील शेळकेंची नाराजी

हा कार्यक्रम भाजपाचा होता. नियमाप्रमाणे आम्हाला निमंत्रण न देता केवळ कार्यकर्त्याप्रमाणे बोलावण्यात आले. जिथे पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी आम्ही असायला हवे होतो, त्याठिकाणचे निमंत्रण आम्हाला नव्हते. विशेष म्हणजे आम्हाला मंदिरातही प्रवेश नव्हता, असा आरोप सुनील शेळकेंनी केला.

Sunil Shelke : 'बेताल वक्तव्ये करणाऱ्या तुषार भोसलेंना व्यासपीठावर स्थान, मात्र...' देहूतल्या पंतप्रधानांच्या कार्यक्रमावर सुनील शेळकेंची नाराजी
भाजपावर टीका करताना सुनील शेळकेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 4:10 PM

मावळ, पुणे : अजित पवार (Ajit Pawar) यांना भाषण करू न देणे हे भाजपाचा पूर्वनियोजित कट होता, तो त्यांनी यशस्वी केला, असा आरोप मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी केला आहे. काल देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिळा मंदिराचा सोहळा पार पडला. त्यानंतर झालेल्या सभेदरम्यान पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करू देण्यात आले नाही. त्यामुळे राज्यभरात राष्ट्रवादीचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. आमदार सुनील शेळके यांच्या मतदारसंघात देहूगाव (Dehu) आहे. मात्र तरी त्यांना सामान्यांप्रमाणे आमंत्रण केले गेले होते. म्हणून ते आधीपासूनच नाराज होते. त्याच भाजपाच्या या भूमिकेची भर पडली आहे. यावरून राष्ट्रवादीने भाजपावर निशाणा साधला आहे. कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही, असा आरोपही करण्यात आला आहे.

‘मंदिरातही प्रवेश नव्हता’

सुनील शेळके म्हणाले, की कार्यक्रमाचा प्रोटोकॉल पाहिला, तर खासदार, आमदार, महापौर यांना कार्यक्रमस्थळी बोलवायला पाहिजे होते. यासंबंधीची जबाबदारी देहू संस्थान किंवा पीएमओ ऑफिसने आमच्याकडे दिली नाही. बहिष्कार कार्यक्रमावर नसून कार्यक्रमाची जी व्यवस्था करण्यात आली होती, यावर नाराजी असल्याचे ते म्हणाले. हा कार्यक्रम भाजपाचा होता. नियमाप्रमाणे आम्हाला निमंत्रण न देता केवळ कार्यकर्त्याप्रमाणे बोलावण्यात आले. जिथे पंतप्रधानांचे स्वागत करण्यासाठी आम्ही असायला हवे होतो, त्याठिकाणचे निमंत्रण आम्हाला नव्हते. विशेष म्हणजे आम्हाला मंदिरातही प्रवेश नव्हता.

हे सुद्धा वाचा

‘केवळ संस्थानचे आणि भाजपाचे लोक होते’

मंदिरातील कार्यक्रमात केवळ संस्थानची काही मंडळी आणि भाजपाचे लोक होते. व्यासपीठावरदेखील स्थानिक खासदार, आमदार, नगराध्यक्षा यांना जागा दिली गेली नाही. भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचा बेताल वक्तव्ये करणाऱ्या कोणीतरी तुषार भोसले नावाच्या व्यक्तीला व्यासपीठावर स्थान देण्यात आले. चंद्रकांत पाटलांना स्थान देण्यात आले, मात्र स्थानिक नेत्यांना कोणतेही स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे तो कार्यक्रम केवळ भाजपाच्या अध्यात्मिक आघाडीचा होता, भाजपा पुरस्कृत होता, असा आरोप शेळके यांनी केला.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.