Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा…’, सुप्रिया सुळे यांचं अमित शाह यांना सडेतोड प्रत्युत्तर

खासदार सुप्रिया सुळे यांची आज पुण्याच्या मुळशी येथे सभा पार पडली. या सभेत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. या टीकेला सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं.

'भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा...', सुप्रिया सुळे यांचं अमित शाह यांना सडेतोड प्रत्युत्तर
अमित शाह आणि सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 10:37 PM

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. त्या आज पुण्याच्या मुळशी येथे बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. “पुत्रीप्रेम आणि पुत्रप्रेम हे म्हणतात, भ्रष्टाचारावर प्रेम करण्यापेक्षा आपल्या मुलामुलींवर प्रेम करणं कधीही चांगल आहे हो…”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिलं. “शिवसेना आणि राष्ट्रवादी अनेक वर्ष एकमेकांच्या विरोधात लढले. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी एकमेकांवर टीकाही केली. पण त्यांनी त्यांचं वैयक्तिक नातं जपलं. माझं लग्नं ठरवण्यात त्यांचा मोठा वाटा होता”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“ही लढाई अदृश्य शक्ती विरोधात आहे. अनेक लोकांना फोन येतात. पण इथे जे बसलेले आहेत ते कुणाला घाबरत नाहीत म्हणून इथे आहेत. पण जे गेले त्यांचीदेखील काही चुकी नाही. त्यांच्यावरही दबाव आहे. ह्यावेळेस जरासं वेगळं वातावरण आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेने दुपटीने ताकद वाढवली आहे. शिवसेना पक्ष हा फक्त आणि फक्त ठाकरेंचीच आहे. मिंदे बिंदे यांना मी मानतच नाही. आजच्या घडीला सर्वात लाडका मुख्यमंत्री मंत्री म्हूणन उद्धव ठाकरे यांचं नावं आहे, हे मी नाही सर्व्हे सांगतो”, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.

‘ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून…’

“ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून आमच्याशी लढून बघा. तुम्ही 40 पार म्हणताय आम्ही तर 48 पार म्हणू. ह्या देशाचा कृषीमंत्री कोण आहे? त्याचं नावं मला सांगावं. त्याचं नावं अर्जुनकुमार मुंडा आहे, कुणाला माहिती आहे का? दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज जेलमध्ये आहेत आणि अशोक चव्हाण कुठे आहेत आज? अशोक चव्हाण आज माझ्यावर नाराज आहेत, त्यांनी परवा माझ्याविरोधात स्टेटमेंट केलं. अहो, तुम्हाला मी भ्रष्टाचारी नाही म्हणत. निर्मला सीतारामन ह्यांचं हे स्टेटमेंट आहे. दोघांवर आरोप केले होते. केजरीवाल जेलमध्ये आहेत तर अशोक चव्हाण हे बाहेर आहेत. केजरीवाल यांनी ऐकलं असतं तर ते पण आज बाहेर असते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

‘जेव्हा शुभ संकेत असतात तेव्हा तुतारी वाजते’

“माझ्यावर टीका करण्यासारखं काही नाही म्हणून ते आज माझ्या संसदरत्न पुरस्कारावर टीका करत आहेत. त्यांना माहिती आहे, ह्यावेळेस त्यांना लोकं मतदान करणार नाहीत, म्हणून आज 5 फेजमध्ये ते निवडणूका घेत आहेत. सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन गोष्टींसाठी तुम्ही मला मतदान करा. जेव्हा शुभ संकेत असतात तेव्हा तुतारी वाजते. मी तीनवेळा खासदार झाले आणि माझं तीन नंबरचं बटन आहे”, असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.

'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर
'खोक्या'चा गेम ओव्हर, स‍तीश भोसलेच्या घरावर; वनविभागाचा बुलडोझर.
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल
'कराड पेक्षा मोठा आका',धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरवर गुन्हा दाखल.
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?
सतीश भोसलेला अखेर बेड्या, पण 'खोक्या' प्रयागराजला पोहोचलाच कसा?.
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर...
आईनेच 8 वर्षाच्या मुलीला 29 व्या मजल्यावरून फेकलं, इतकंच नाहीतर....
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?
'तुमचा तमाशा करायला वेळ लागणार नाही', रवींद्र धंगेकरांना कोणाचा इशारा?.
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट
मिटकरींचा राणेंना टोला, शिवरायांच्या मुस्लिम सरदारांची यादी केली ट्विट.
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.