इंधन दरवाढीमुळे लोकांचे कंबरडे मोडले, संसदेत गॅसचे दर कमी करण्याची मागणी करणार : सुप्रिया सुळे

| Updated on: Nov 01, 2021 | 5:52 PM

देशात मागील काही महिन्यांपासून इंधन तसेच गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल तसेच डिझेलचे दर थेट शंभरीपार गेल्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार तसेच भाजपवर निशाणा साधलाय.

इंधन दरवाढीमुळे लोकांचे कंबरडे मोडले, संसदेत गॅसचे दर कमी करण्याची मागणी करणार : सुप्रिया सुळे
SUPRIYA SULE
Follow us on

मुंबई : देशात मागील काही महिन्यांपासून इंधन तसेच गॅसचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल तसेच डिझेलचे दर थेट शंभरीपार गेल्यामुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार तसेच भाजपवर निशाणा साधलाय. त्यांनी “इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडं मोडलंय. आर्यन खान जितके दिवस जेलमध्ये होता त्या दिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढलेत ते बघा. मी संसदेत गॅसचे दर कमी करण्याची मागणी करणार आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच दिल्लीत आपलं सरकार आल्यावर पहिल्यांदा गॅसचे दर कमी करणार, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांनी दिले. त्या पुण्यात बोलत होत्या.

संसदेत गॅसचे दर कमी करा अशी मागणी करणार

इंधनाच्या वाढत्या दरामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. तसेच मागील काही दिवसांपासून घरगुती गॅसचे दरसुद्धा वाढत आहेत. हाच मुद्दा घेऊन विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. सध्या राज्यात महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे नेते निवडणूक असलेल्या शहरांना भेटी देत आहेत. पुणे पालिका निवडणूक जिंकायचीच असा चंग राष्ट्रवादीने बांधलाय. आज (1 नोव्हेंबर) सुप्रिया सुळे पुण्यात बोलत होत्या. यावेळी त्यांनी इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर भाष्य केलं. त्यांनी “आर्यन खान जेवढे दिवस जेलमध्ये होता त्या दिवासात पेट्रोल आणि डिझेलचे भाव किती वाढले आहेत ते बघा. सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. मी संसदेत गॅसचे दर कमी करा अशी मागणी करणार आहे. दिल्लीत आपलं सरकार आल्यावर पहिल्यांदा गॅसचे दर कमी करणार,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कॉपी करून पास झालेल्या लोकांनी  पुण्याचं वाटोळं केलं

सध्या पुणे महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. याच कारणामुळे त्यांनी पुणे शहरातील विकासावर बोट ठेवले आहे. पुणे महापालिकेतील भाजपने 58 कोटी रुपये सिग्नल रिपेअर करण्यासाठी खर्च केले आहेत. कॉपी करून पास झालेल्या लोकांनी पुणेकरांचं वाटोळं केलं आहे. आमचं सरकार सत्याचं आणि संघर्षाचे सरकार आहे,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पुण्यातील लोक भाजपला थकले

दरम्यान, पुण्यात राष्ट्रवादीचाच महापौर होणार असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी यापूर्वी व्यक्त केला होता. “पत्रकार सांगतात की पुण्यातील लोक भाजपला थकले आहेत. एकदा मतदान केलं, पण महापौरांकडून चांगलं काम झालं नाही. येणाऱ्या निवडणुकीत महापौर राष्ट्रवादीचा होईल, असं लोक सांगत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. अजितदादांकडून काम करुन घ्या, निवडणुकीच्या कामाला लागा. पुढचा महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल. प्रचार सुरु करा, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

इतर बातम्या :

Special Story ! अतिवृष्टीतील नुकसानीच्या खुणा, एकाच जिल्ह्यात 30 दिवसांमध्ये 25 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

समीर वानखेडे दिल्लीत मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या भेटीला, राज्य सरकारकडून कागदपत्रं मागवली जाणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं खुलं पत्रं, पाच मुद्द्यावर केला फोकस