सुप्रिया सुळे अधिकाऱ्यांवर संतापल्या, आता सरळ गडकरींकडे तक्रार करणार, काय आहे प्रकरण

पुण्याच्या भोरमधील शिवरे गावातील रिंग रोडसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रिंग रोडला ग्रामस्थांचा विरोध होता.

सुप्रिया सुळे अधिकाऱ्यांवर संतापल्या, आता सरळ गडकरींकडे तक्रार करणार, काय आहे प्रकरण
supriya suleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 18, 2023 | 9:00 AM

विनय जगताप, भोर, पुणे : खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) शांत व्यक्तीमत्व. त्या क्वचितच संतापत असतील. परंतु नुकत्याच झालेल्या एका बैठकीत त्यांचा संताप अनावरण झाला. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच झापले. त्यानंतर यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (road Transport & Highways minister nitin gadkari) यांच्यांकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. विषय सुप्रिया सुळे यांच्या मतदार संघातील होता. पुणे येथील भोरमधील गावातील रस्त्यासंदर्भात त्यांनी बैठक घेतली होती. या बैठकीत अधिकारी आपली आढमुठी भूमिका सोडत नसल्यामुळे सुप्रिया सुळे यांचा संताप अनावर झाला होता. त्यांच्या या भूमिकेनंतर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

काय होता विषय

पुण्याच्या भोरमधील शिवरे गावातील रिंग रोडसंदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. गावाच्या हद्दीतून जाणाऱ्या रिंग रोडला ग्रामस्थांचा विरोध होता. हा विषय ग्रामस्थ अधिकाऱ्यांना सांगत होते. अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या विरोधी भूमिका घेत, रस्ता करणारं अशी भूमिका घेतली.

हे सुद्धा वाचा

यामुळे खासदार सुप्रिया सुळे संतापल्या. रस्ता कराल, अशी कितीही मस्ती असली तरी ग्रामस्थ हो म्हणत नाही तोपर्यंत मी रस्ता होऊ देणार नाही. तुमची तक्रार गडकरी साहेबांकडे करावी लागेल, असे सुळेंनी अधिकाऱ्यांना सुनावले सुप्रिया सुळेंनी अधिकाऱ्यांना चार खडे बोल सुनावले. यामुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते.

परभणीत केले होते गडकरींचे कौतूक

संपुर्ण केंद्रीय मंत्रिमंडळात सरकारमध्ये काम करणारे नितीन गडकरी एकमेव मंत्री आहेत आणि ते मी रेकॉर्डवर मान्य करते, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. परभणी जिल्ह्यात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भारतीय जनता पक्षाचे नेते विशेषतः महाराष्ट्रातील नेते खूप खोटं बोलतात. त्यांना यासंदर्भात पुरस्कार द्यायला हवा. कोणते धार्मिक पुस्तक त्यांना हे शिकवते, मला माहीत नाही. परंतु त्याचे उत्तर त्यांना कधीतरी द्यावेच लागेल. भाजपमधील नितीन गडकरी हे एकमेव मंत्री आहे, जे काम करताना पक्षाचा विचार करत नाही.

नितीन गडकरी मोदी सरकारमध्ये दुसऱ्यांदा भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत आहे. ही जबाबदारी सांभाळताना त्यांनी देशात अनेक ठिकाणी महामार्गांचे जाळे उभे केले. नुकतेच दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे उद्घाटन झाले. त्यांच्या रस्ते उभारण्याच्या कामाचे कौतूक सर्वच जण करतात. काम करताना नितीन गडकरी पक्ष पाहत नाही, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.