Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरोधात असले की ईडी आणि भाजपात आले की घोटाळामुक्त, हे औषध कोणतं? अमित शाह यांना सुप्रिया सुळेंचा सवाल

अमित शहांना माझे दोन प्रश्न आहेत, विरोधात असले की ईडी लावता आणि तुमच्या पक्षात आले की ईडी गायब होते तुम्ही कोणते औषध वापरता ते सांगा, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शाह यांना सवाल केले आहेत.

विरोधात असले की ईडी आणि भाजपात आले की घोटाळामुक्त, हे औषध कोणतं? अमित शाह यांना सुप्रिया सुळेंचा सवाल
सुप्रिया सुळे यांचे अमित शाह यांना सवाल
Follow us
| Updated on: Feb 23, 2022 | 10:23 PM

इंदापूर : नवाब मलिक (Nawab Malik Arrest) यांना अटक आणि राज्यातला पॉलिटिकल ड्रामा यावर नेते भरभरून व्यक्त होत आहेत. काही वेळापूर्वीच विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडी आणि नवाब मलिकांवर गंभीर आरोप करून गेले. अंडरवर्ल्डशी संबध असणाऱ्यांना वाचवणे अतिशय निदनिय आहे, अशी टीका त्यांनी केली आहे. आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना काही थेट सवाल केले आहेत. अमित शहांना माझे दोन प्रश्न आहेत, विरोधात असले की ईडी लावता आणि तुमच्या पक्षात आले की ईडी गायब होते तुम्ही कोणते औषध वापरता ते सांगा, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी शाह यांना सवाल केले आहेत. ईडीचा पेपर फुटतो त्यांच्यावर कारवाई का होत नाही? महाराष्ट्र खूप अडचणीच्या काळात चालला आहे. दिल्लीची माणसं महाराष्ट्राचा अपमान करत आहेत. पण दिल्लीसमोर मोडेल पण वाकणार नाही, असे सुप्रिया सुळे यांनी ठणकावले आहे.

ईडीची नोटीस आली की आमचं सरकार येतं

तसेच लढेंगे जरुर जितेंगे जरुर.आपल्याला ईडीची नोटीस आली की राज्यात आपले सरकार येते. पहिली नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात सरकार आले, झेडपीत आम्ही त्यांना झिरोवर आणणार आहे. काही लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते. असेही त्या म्हणाल्या. भाजपला उद्देशून बोलताना, आम्ही तुमच्यामागे ईडी वगैरे लावणार नाही. तिसरी नोटीस आली की देशात सत्ता येईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच देशामध्ये कोणीही आरोप केले तेव्हा इंदापूरमधील जनता साहेबांसोबत राहिली, अजितदादा आले की टॉनिक आणि साहेब आले की चव्यनप्राश मिळते असेही त्या म्हणाल्या.

फडणवीसांचे टेरर फंडिंगचे आरोप

नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर कोर्टाने मलिकांना आठ दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याआधी ईडीकडून नवाब मलिकांची पहाटेपासून दुपारपर्यंत म्हणजे जवळपास आठ तास चौकशी करण्यात आली. राज्यात सध्या यावरून जोरदार वाद सुरू आहे. तर दाऊदशी व्यवहार करणाऱ्याला सरकार वाचवतंय देशात यामुळे अतिशय चुकीचा संदेस जाईल, अशी टीका फडणवीसांनी केली आहे. हसीन पारकरला 55 लाख दिल्याचे पुरावे ईडीकडे आहेत. ही जमीन अंडरवर्ल्डच्या मदतीने नवाब मलिकांना मिळाली. यातले सगळे पैसे अंडरवर्ल्डला गेले. असे म्हणत फडणवीसांनी मलिकांवर टेरर फंडिंगचेही आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात नवं ट्विस्ट येण्याची शक्यता आहे.

मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका
मुस्लिम मतं महायुतीला जाण्याची त्यांना भीती आहे; सामंतांची टीका.
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना
धैर्यशील मानेंच्या त्या विधानावर महायुतीच्या नेत्यांच्या संमिश्र भावना.
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज
राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या निकालावर एमपीएससीचे विद्यार्थी नाराज.
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका
गुणरत्न सदवार्तेंची पुन्हा मनसेवर टीका.
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण
अजितदादांनी वास्तव भूमिका मांडली - अशोक चव्हाण.
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश
संभाजीनगरच्या किराडपुरा भागात मुस्लिम बांधवांनी दिला एकोप्याचा संदेश.
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप
वक्फच्या जमिनी आपल्या मित्रांना द्यायच्या आहेत, ठाकरेंचा भाजपवर आरोप.
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर
आमची दारं त्यांच्यासाठी कायम उघडी..; संजय शिरसाटांची खैरेंना ऑफर.
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.