अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार घालायची संधी द्या; सुप्रिया सुळे यांची कुणाला विनंती?

कोणत्याही पदात स्त्री-पुरुष असं नसतं. कर्तृत्ववान व्यक्ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसावी. महाराष्ट्राला एक नंबरवर आणणारा मुख्यमंत्री असावा. माझ्या आयुष्यात माझ्यासाठी काहीही केलेलं असेल तर ते मी विसरत नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास पहिला हार घालायची संधी द्या; सुप्रिया सुळे यांची कुणाला विनंती?
supriya sule Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 06, 2023 | 7:40 PM

नाविद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बारामती | 6 ऑक्टोबर 2023 : अजित पवार यांना मुख्यमंत्री करायचंच ठरलं तर त्यांना पाच वर्षासाठी आम्ही मुख्यमंत्री करू, असं जाहीर विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क व्यक्त केले जात आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनी तर अजितदादा मुख्यमंत्री झाल्यास त्यांना पहिला हार घालण्याची संधी मला द्या, अशी विनंतीच देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचेही राजकीय अर्थ काढले जात आहेत.

सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर होत्या. माळेगावमध्ये पत्रकार कट्ट्यावर गप्पा मारताना त्यांनी हे आश्चर्यकारक विधान केलं. अजितदादांना आम्ही पाच वर्षासाठी मुख्यमंत्री करू, असं फडणवीस म्हणाल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं. त्यावर त्यांनी मार्मिक टोलेबाजी केली. मी देवेंद्रजींचे आभार मानते. अजितदादा मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना पहिला हार घालायची संधी मला मिळावी ही विनंती करते. भाजप एवढा त्याग करु शकते हे विशेष. काँग्रेस विचारांचे मुख्यमंत्री तुम्हाला चालतात हे नवल. भाजपचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, असा खोचक टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

दिल्ली के सामने झुकेंगे नहीं

पक्ष चिन्ह आणि पक्षाच्या ताब्यावरून त्यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरही त्यांनी टीका केली. एक गृहस्थ म्हणाले पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल. एक तर पेपर फुटला असेल किंवा अदृश्य शक्तीचा यामागे हात आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा. इथे लोकशाही आहे. दडपशाही नाही. शरद पवार यांनी पक्ष स्थापन केला. ते सोबत येत नाहीत म्हणून तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता. आम्ही संघर्ष करत राहू. दिल्ली के सामने झुकेंगे नहीं, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.

अदृश्य शक्तीच…

पूर्वी बाळासाहेब ठाकरे असताना कुणी दिल्लीला जायचं का पालकमंत्रीपदासाठी? अदृश्य शक्तीच सगळं चालवतेय. तुम्ही दिल्लीला का जाताय? बाळासाहेबांचे विचार असते तर असं घडलं नसतं. आमची वैचारिक लढाई आहे. व्यक्तीगत नाही, असं त्या म्हणाल्या.

म्हणून घरं फोडणार का?

पक्ष आणि घरं फोडण्याचं काम भाजप करतंय. या गोड बासुंदीत मीठ टाकण्याचं काम भाजपने केलं. पवारसाहेब तुमच्यासोबत येत नाहीत म्हणून पक्ष फोडणार? घरं फोडणार? शिवसेनेलाही भाजपनेच फोडलं. हे सगळं भाजपची अदृश्य शक्ती करत आहे. भाजपने फोडाफोडीचं नवीन राजकारण राज्यात सुरू केलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

आंबेडकरांचं स्वागतच

वंचित बहुजन आघाडीचा इंडिया आघाडीत समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही प्रकाश आंबेडकर यांचं स्वागत करतो. आमची इच्छा आहे त्यांनी आमच्यासोबत यावं, असं त्या म्हणाल्या. माझ्याविरोधात कोण तरी लढणारच. माझ्या विरोधात कोण असेल माहिती नाही. कामावर निवडणुक लढवली जावी हे माझं मत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.