Supriya Sule Vs Sunetra Pawar | बारामतीत ठरलेच, नणंद विरुद्ध भावजय, स्वत: सुनेत्रा पवार यांनी दिले संकेत

Supriya Sule Vs Sunetra Pawar | बारामतीच्या विकासविषयी तळागाळातील प्रत्येक जण साक्षीदार आहे. तुम्ही सर्वांनी अजित दादांना नेहमी प्रेम दिले आहे. त्या प्रेमाचे उतराई होण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु. बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

Supriya Sule Vs Sunetra Pawar | बारामतीत ठरलेच, नणंद विरुद्ध भावजय, स्वत: सुनेत्रा पवार यांनी दिले संकेत
Supriya Sule Vs Sunetra Pawar
Follow us
| Updated on: Feb 24, 2024 | 10:55 AM

बारामती, पुणे, दि. 24 फेब्रुवारी 2024 | देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागली आहे. पुढील काही दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होणार आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. परंतु निवडणुकीपूर्वी संपूर्ण राज्याचे लक्ष पुणे जिल्ह्याकडे लागले आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होती. परंतु आता स्वत: सुनेत्रा यांनी यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहे. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.

काय म्हणाल्या सुनेत्रा पवार

बारामतीमधील कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीच्या विकासविषयी तळागाळातील प्रत्येक जण साक्षीदार आहे. तुम्ही सर्वांनी अजित दादांना नेहमी प्रेम दिले आहे. त्या प्रेमाचे उतराई होण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु. बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील. तुम्ही मला एक संधी द्याल, अशी आशा मी बाळगते. सुनेत्रा पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे बारामती लोकसभेच्या त्या उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट संकेत आहे.

सुनेत्रा पवार दोन दिवसांपासून दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार गेल्या दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज दुसऱ्या दिवशी विविध विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन त्या करणार आहेत. शुक्रवारी सुनेत्रा पवार यांनी विश्वकर्मा जयंतीला देखील उपस्थिती लावली होती. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार बारामतीत सक्रिय झाल्याचे पहावयास मिळत आहे. बारामती मतदार संघात सुनेत्रा पवार अनेक कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत.

हे सुद्धा वाचा

बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे मतदार संघाचे दौरे करत आहेत. त्यांनी संत गाडगे महाराज आणि संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बारामती दौऱ्याची सुरुवात केली. तसेच स्वच्छता केली. सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता त्या म्हणाल्या, मी खासदार होण्याच्या दोन वर्षापूर्वीपासून मतदार संघाचे दौरे करत होते. संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता. आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या बारामती दौऱ्यांमुळे बारामतीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.