सुषमा अंधारे यांच्याकडून राज ठाकरे यांचा उल्लेख पोस्टमन; म्हणाल्या, पोस्टमनने महाशक्तीला…
सामाजिक संघटना एकत्रित येऊन या सन्मान परिषदा घेत आहेत. नाहीतर शिवसेनेच्या अंधारे राष्ट्रवादीच्या मंचावर गेल्याचं ट्विट सुरू व्हायचं, असा टोलाही त्यांनी लगावला.
पुणे: ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. गेल्यावेळी ऊठ दुपारी, घे सुपारी, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना डिवचले होते. आता त्यांनी राज ठाकरे यांचा पोस्टमन असा उल्लेख करत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे यांनी महाशक्तीला पत्र लिहून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना माघारी बोलावण्याची मागणी करावी, असा खोचक सल्ला सुषमा अंधारे यांनी दिला आहे.
सुषमा अंधारे या पुण्यात बोलत होत्या. हल्ली खूप पोस्टमन झाले आहेत. पोस्टमन असणारे लोक राज्यपाल भगतसिंह कोश्यारी विरोधात एक पत्र महाशक्तीला लिहावं. कोश्यारींना परत बोलवा म्हणून ते पत्रं का लिहीत नाही? म्हणजे पोस्टमनचं पत्र लिहिणंही स्क्रिप्टेड आहे काय? असा टोला सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांना नाव न घेता लगावला आहे.
फुलेंशी तुलना होतेय
यावेळी त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही नाव न घेता टीका केली. एक बाई चंद्रकांत दादांची ज्योतिबा फुलेंसोबत बरोबरी करते. खुटाने कुठं उंटाचा मुका घ्यायचा असतो का? अशा शब्दात अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर नाव न घेता टीका केली.
चकार शब्द काढत नाहीत
सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घणाघाती हल्ला चढवला. माझं 15 वर्ष जुनं प्रकरण बाहेर काढून त्यावर काही लोक बलोत आहे. पण बागेश्वर बाबाच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत. अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यापासून माझ्याविरोधात आंदोलन करणारे सगळेच शांत आहेत. चकार शब्द काढायला तयार नाहीत, असा हल्लाही त्यांनी चढवला.
ठरवून डॅमेज
सामाजिक संघटना एकत्रित येऊन या सन्मान परिषदा घेत आहेत. नाहीतर शिवसेनेच्या अंधारे राष्ट्रवादीच्या मंचावर गेल्याचं ट्विट सुरू व्हायचं, असा टोलाही त्यांनी लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅम्पनिंगमध्ये तीन टप्पे आहेत. डॅमेज, होप आणि अॅक्शन हे तीन टप्पे आहेत.
नेहरूंवर बोलून देखील मोदींना नेहरूंना डॅमेज करता आलं नाही. महात्मा गांधी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाही डॅमेज करता येत नाही. महापुरुषांवर बोलणं म्हणजे जीभ घसरली. चुकून बोललो असं नाही. हे लोक ठरवून बोलतात. ठरवून डॅमेज करतात. महापुरुषांना जाणीवपूर्वक डॅमेज केलं जातं, असा आरोप त्यांनी केला.