Rahul Narwekar : राहुल नार्वेकर यांना पाहिल्यावर ‘होणार सून मी या घरची’ मालिकेची आठवण येते… कोण म्हणालं असं? का?

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलच फटकारलं आहे. त्यामुळे विरोधकांनीही आता नार्वेकर यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.

Rahul Narwekar : राहुल नार्वेकर यांना पाहिल्यावर 'होणार सून मी या घरची' मालिकेची आठवण येते... कोण म्हणालं असं? का?
rahul narwekar Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 13, 2023 | 3:13 PM

अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 13 ऑक्टोबर 2023 : आमदार अपात्रतेच्या प्रकरणात होत असलेल्या दिरंगाईवरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना चांगलंच फटकारलं आहे. विधानसभा अध्यक्षांना आदेश देऊनही कोणतीच कार्यवाही केली नसल्याचं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच पुढच्या निवडणुकीच्या आधी निर्णय घ्या. त्यानंतर निर्णय घेतला तर ती कार्यवाही निरर्थक ठरेल, असं कोर्टाने म्हटलं आहे. कोर्टाने नार्वेकर यांना फटकारल्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गटाने नार्वेकर यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही नार्वेकर यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला आहे.

राहुल नार्वेकरांचं काम बघितलं की मला होणार सून मी या घरची ही मराठी सीरिअल आठवते. त्यातली जानवी. तिला बाळच होत नव्हतं ते सगळं आठवतं. कारण राहुल नार्वेकरांच्या निकालाचे देखील तसेच आहे, तो काही येतच नाही, असा चिमटा काढतानाच नार्वेकर साहेबांचं काम म्हणजे शिंदे गटाला होणारी मदतच आहे. कोर्टाचं नार्वेकर ऐकतील का? शहाण्याला शब्दांचा मार असतो हे कळण्या इतके हे लोक विवेकी आहेत का?अध्यक्ष नेमण्यात आला ते देखील योग्य आहे का? असे सवाल सुषमा अंधारे यांनी केले.

ठाकूर यांना काम करू देणार नाही

ससून ड्रग्स प्रकरणावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ससून ड्रग्स प्रकरणात नार्को टेस्ट झाली पाहिजे. राज्यातील अनेक मंत्री आणि आमदार या प्रकरणात गोवले गेले आहेत. राज्यातलं गृहखातं आणि आरोग्य खातं सध्या व्हेंटिलेटरवर आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही या सगळ्यावर आवाज उठवू. 24 ऑक्टोबरनंतर संजीव ठाकूर यांना ससून रुग्णालयात काम करू देणार नाही, असा इशाराच अंधारे यांनी दिला.

महाजन यांचाही हात असू शकतो

ललित पाटील यांच्यावर गिरीश महाजन यांचा देखील वरदहस्त असू शकतो. आताच माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ज्यांची बायको गेल्या अनेक दिसांपासून बेपत्ता आहे. याच स्त्रीवर संजीव ठाकूर यांनी 45 दिवस शॉक ट्रीटमेंट केली होती. त्यावेळी गिरीश महाजन यांनी संजीव ठाकूर यांच्यावर दबाव आणला होता. म्हणून यात देखील महाजन यांचा हात असू शकतो, असा खळबळजनक आरोप अंधारे यांनी केला.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.